घरमुंबईप्रवीण दरेकरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा; चांगले शिक्षण घेण्याचे केले आवाहन

प्रवीण दरेकरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा; चांगले शिक्षण घेण्याचे केले आवाहन

Subscribe

मुंबई : भाजपा मागाठाणे विधानसभेतर्फे वॉर्ड क्रमांक 12, 14, 26 व 27 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व मोफत वह्या वाटप (long Book) कार्यक्रम नुकताच भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचे शिक्षण घ्यावे, शिकत असताना काहीही कमी पडले तर, मी आपल्या पाठीशी आहे, असा विश्वास दरेकर यांनी उपस्थित विद्यार्थी वर्गाला दिला. (Meritorious students felicitated by Praveen Darekar Appealed to get good education)

हेही वाचा – Sharad Pawar : अजित पवारांना…; शरद पवार यांनी सांगितलं भेटीमागचं कारण

- Advertisement -

वॉर्ड क्रमांक 27 येथे सोलापूर मित्र मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना दरेकर म्हणाले की, आज विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम होणार आहे. विद्यार्थ्यांकडून माझी एकच अपेक्षा आहे की, तुम्ही शिकायला हवे, अभ्यास करायला हवा. कारण आपले आई-वडील रात्रंदिवस मेहनत करून, काबाडकष्ट करतात ते कोणासाठी? माझ्या मुलांनी शिकले पाहिजे. आम्ही जे कष्ट उपसले ते त्यांच्या नशिबी येऊ नये. जर आपले पालक मेहनत घेत असतील तर, तुम्हाला ते काम करावे लागेल. तुमच्याकडून अपेक्षा आहे. शिकत असताना तुम्हाला काहीही कमी पाडले तर, मी आपल्या पाठीशी उभा राहीन. परंतु आपण चांगल्या प्रकारचे शिक्षण घेतले पाहिजे. परमेश्वराच्या, पांडुरंगाच्या आशीर्वादाने मला अधिकार दिले आहेत, सत्ता आहे. भगवंताने दिले आहे, ते आपल्या या चांगल्या कामासाठी निश्चितपणे कमी पडणार नाही, असा विश्वासही दरेकर यांनी दिला.

दरेकर म्हणाले की, आज आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार का करतोय तर, त्यांनी चांगले गुण मिळवले आहेत म्हणून. दुसऱ्याही मुलांना वाटते माझाही सत्कार व्हावा, चांगले गुण मिळवले पाहिजेत, अशा प्रकारची भावना असते. चाळीतील मुलेही मोठी झाली पाहिजेत, शिकली पाहिजेत. यासाठी आपण 3 अभ्यासिका सुरू केल्या आहेत. येथील विद्यार्थ्यांसाठी चौथी अभ्यासिका सुरू करु. अभ्यासिकेसाठी जो काही निधी लागेल तो उपलब्ध करून देईन, पण कष्टकऱ्यांच्या मुलाने शिकले पाहिजे, असेही दरेकर म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – कोकणवासीयांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेवर विशेष गाड्या धावणार

दरेकर म्हणाले की, सोलापूर मित्र मंडळाने जे जे मागितले ते ते देण्याचे काम मी सातत्याने केले आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराला आलो तेव्हाही म्हटले होते, जी लागेल ती मदत केली जाईल. वारकरी सांप्रदायाची इच्छा आहे की, येथे भव्यदिव्य विठ्ठल-रुख्मिणी मूर्ती हवी. आपण सर्वात चांगली मूर्ती देऊ. येथील सर्व वारकऱ्यांना ते श्रद्धेचे ठिकाण होईल याची काळजी घेऊ, कारण वारकऱ्यांचा आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. या कार्यक्रमाला खासदार गोपाळ शेट्टी, माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, माजी जिल्हा अध्यक्ष श्रीकांत पांडे, जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, महिला मंडळ अध्यक्षा रश्मी भोसले, नगरसेविका आसावरी पाटील, प्रितम पंडागळे, सुरेखा पाटील, मंडळ पदाधिकारी, स्थानिक वॉर्ड अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -