घरमुंबई'मुंबई महापालिका टँकर माफियांच्या पाठीशी'

‘मुंबई महापालिका टँकर माफियांच्या पाठीशी’

Subscribe

मुंबईतील काही भागात टॅन्कर माफीयांच्या प्रभावामुळे पाणी टंचाई निर्माण झाली असून सध्या मुंबईमध्ये टँकर माफियांचे साम्राज्य पसरले आहे. मात्र यांना मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी पाठीशी घालत असल्याची अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी दिली आहे.

‘मुंबईकर नागरिकांना स्वच्छ आणि सुरळीत पाणीपुरवठा करणे हे महानगरपालिकेचे बंधनकारक कर्तव्य आहे. मुंबईमध्ये सध्या सर्वच विभागात किमान २० ते ३० टक्के पाणी कपात केली आहे. यामुळे पाणी पुरवठयाला योग्य प्रकारे दाब नसुन काही विभागात पुरेसे पाणीही येत नाही. यामुळे कुलाबा, कफपरेड, वरळी, सायन कोळीवाडा, घाटकोपर, वांद्रे, भांडूप आणि पश्चिम उपनगरांतील अनेक विभागातील चाळी, झोपडपट्टी आणि इमारती तसेच दक्षिण मुंबईतील काही भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. ‘एच – पश्चिम’ आणि मुलूंड विभागात २४ तास पाणी पुरवठा करण्याचा महापालिकेने प्रायोगीक तत्त्वावर प्रकल्प राबविण्याची योजना जाहीर केली होती. परंतु सदर योजना यशस्वी झाली नाही. उलट काही भागात टॅन्कर माफीयांच्या प्रभावामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. संपूर्ण मुंबईमध्ये टँकर माफियांचे साम्राज्य आहे. मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत. मुंबईकरांचे हक्काचे पाणी त्यांना विकत घ्यावे लागत आहे. टँकर माफिया राज्य लवकरात लवकर संपविले पाहिजे. तसेच मुंबईमध्ये काही भागात अजुनही दुषित पाण्याचा पुरवठा होत असून त्या भागातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे’, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी दिली. मनपा आयुंक्ताची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये ते बोलत होते.

पाण्याच्या गळतीमध्ये २५ टक्के पाणी वाया

मुंबईकरांना मुबलक आणि शुद्ध पाणी मिळालेच पाहिजे. मुंबईतील विविध कारणामुळे पाण्याची गळती होते यामध्ये किमान २५ टक्के पाणी वाया जाते. प्रतिदीन १६.७ एमएलडी एवढे पिण्यायोग्य पाणी वाहने धुण्यासाठी वापरले जाते. मुंबईमध्ये प्रति माणसी दररोज १५० लिटर पाण्याची आवश्यकता आहे. परंतु सध्या १३५ लिटर पाणी प्रती माणसी मिळत आहे. तसेच सरासरी ३ हजार ८०० दशलक्ष पाणी पुरवठा केला जातो. मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता तो ४ हजार ३०० दशलक्ष लीटर करण्यात यावा. मुंबई शहराची भविष्यातील पाण्याची मागणी भागविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने गारगाई, पिंजाळ आणि दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्पाचे काम सध्या चालू असून ते जलद गतीने सुरु करण्यात यावे. दरवर्षी प्रशासन ८ टक्के इतकी पाण्याची दरवाढ करीत आहे.

- Advertisement -

अन्यथा मुंबई काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येईल

रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात रुपये १ हजार ५०० कोटींची तरतुद केलेली आहे. ऑक्टोबर २०१८ पासुन रस्ते दुरुस्तीची कामे चालू आहेत. परंतु काही रस्त्यांची दुरुस्ती अजूनही अर्धवट स्थितीत आहे. तरी पावसाळ्यामध्ये नादुरुस्त रस्त्यांमुळे मुंबईकर नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी सर्व रस्त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करावी. अनेक ठिकाणी नाले सफाई पूर्ण झालेली नाही. मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण १०० टक्के नालेसफाई तातडीने करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. मुंबईकरांना पुरेसा, स्वच्छ आणि किमान दरात पाणी पुरवठा उपलब्ध करण्याबाबत, रस्ता दुरुस्ती आणि नालेसफाईसाठी तातडीने उपाययोजना करावी. मुंबई महानगर पालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असून देखील हि मुंबईकरांना मूलभूत सोयी सुविधा वर्षानुवर्षे मिळत नाही आहेत. मनपा आयुक्तांनी या सर्व समस्यांवर गंभीरपणे लक्ष घालून उपाय योजना कराव्यात अन्यथा मुंबई काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मिलिंद देवरा यांनी दिला आहे.

३१ मे पर्यंत संपूर्ण मुंबईतील नाले सफाई १०० टक्के पूर्ण करणार आहे. जिथे जिथे गढूळ पाणी पुरवठा होत आहे तिथे मी स्वतः भेट देऊन उपाय योजना करणार आहे. टँकर माफियांवर ही लवकरात लवकर कारवाई आम्ही निश्चितच करू.  – प्रवीण परदेशी,मनपा आयुक्त

- Advertisement -

वाचा – विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा; मिलिंद देवरांच्या सूचना

वाचा – शिवसेना-भाजपची महायुती नाही ही तर ‘सहयुती’ – मिलिंद देवरा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -