घरदेश-विदेशस्कूल बस चालकाने ५ वर्षीय मुलीचे केले लैंगिक शोषण, पोक्सो दाखल

स्कूल बस चालकाने ५ वर्षीय मुलीचे केले लैंगिक शोषण, पोक्सो दाखल

Subscribe

दिल्ली शहर महिला व मुलींसाठी सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शहरात चिमुरड्या मुलीदेखील सुरक्षित नाही. दिल्लीच्या रोहिणी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका ५ वर्षीय शाळकरी मुलीचे स्कूल बस चालकाने लैंगिक शोषण केले आहे. दिल्ली पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली आहे.

काय आहे घटना?

- Advertisement -

दिल्लीच्या रोहिणी परिसरात सेक्टर २५ मध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाची मुलगी दररोद स्कूल बसने शाळेत जाते. त्यांची मुलगी सोमवारी शाळेत जायला नकार देत होती. त्यानंतर खूप विनंत्या केल्यानंतर ती शाळेत जायला तयार झाली, परंतु ती म्हणाली की, मी शाळेत जाईन पण मी स्कूल बसने जाणार नाही. त्यावर तिच्या पालकांनी तिची अधिक चौकशी केल्यानंतर त्या चिमुरडीने सांगितले की, स्कूल बसचा चालक तिला त्रास देतो. तो तिला कुठेही स्पर्श करतो. त्यानंतर त्या मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

गुन्हा केला कबूल

पोलिसांनी तक्रार दाखल करुन तपास सुरू केला. शाळेच्या मदतीने त्यांनी सुरेश नावाच्या स्कूल बस चालकाला अटक केली आहे. त्याने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. त्याने पोलिसांकडे कबूल केले आहे की, तो सर्व मुलांना शाळेतून घरी सोडल्यावर सर्वात शेवटपर्यंत त्या गाडीतच बसवून ठेवायचा. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याच्यार करायचा.

- Advertisement -

वाचा – गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना पक्षांनी उमेदवारी देऊ नये – राज्यपाल

पोक्सो दाखल

रोहिणी येथील पोलीस उपायुक्त रजनीश गुप्ता याबाबत म्हणाले की, सुरेशला आम्ही अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय दंडसंहितेच्या पोक्सो कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीदेखील दिल्लीमधील स्कूल बस चालकांनी लहान मुलांवर अत्याचार केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -