घरमुंबईअंधेरी येथून दहावीच्या दोन विद्यार्थिनी मिसिंग

अंधेरी येथून दहावीच्या दोन विद्यार्थिनी मिसिंग

Subscribe

दोघीबाबत ठोस माहिती मिळाल्याचा पोलिसांचा दावा

अंधेरी येथून दहावीच्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनी शुक्रवारी दुपारपासून मिसिंग असल्याने त्यांच्या पालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी डी.एन. नगर पोलिसांत मिसिंग तक्रार दाखल होताच या दोघींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता, अखेर या दोघीबाबत ठोस माहिती मिळाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत या दोघींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

सोळा वयोगटातील या दोन्ही मुली अंधेरी परिसरात राहत असून सध्या दहावीत शिकतात. शुक्रवारी त्यांचा भूगोलचा शेवटचा पेपर होता, सकाळी ते दोघीही पेपर देण्यासाठी अंधेरीतील एका खासगी शाळेतील परिक्षा केंद्रावर गेल्या होत्या. दुपारी पेपर संपल्यानंतर त्या दोघीही घरी गेल्या नाही, बराच उशीर झाल्याने त्यांच्या पालकांनी त्यांचा शोध घेतला, मात्र त्या कुठेच सापडल्या नाही. त्यामुळे भयभीत झालेल्या त्यांच्या पालकांनी डी.एन. नगर पोलिसांत या दोघींची मिसिंगची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरु केला होता.

- Advertisement -

दुसरीकडे या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत एका विशेष पथकाची नियुक्ती केली होती. रात्री उशिरा या दोघींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले जाईल. तिथे त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले जाईल असे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले.

बांबूच्या परातीवरुन चढून घरफोडी
इमारत दुरुस्तीसाठी लावलेल्या बांबूच्या परातीवरुन चढून घरफोडी करणार्‍या एका वॉण्टेड असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला शनिवारी ताडदेव पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. लक्ष्मण धुलिया मीना ऊर्फ अंगारी असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध घरफोडीच्या सुमारे अकराहून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला येथील लोकल कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या अटकेने घरफोडीच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ताडदेव येथील फोरजेट स्ट्रिटमध्ये अर्बन हाऊस नर्सिंग हॉस्टेल असून या हॉस्टेलच्या तिसर्‍या मजल्यावरील फ्लॅटमध्ये सीबी मथ्यू ही 27 वर्षांची नर्स तिच्या तीन सहकारी मैत्रिणीसोबत राहते. सीबी ही भाटिया रुग्णालयात गेल्या सहा वर्षांपासून नर्स म्हणून काम करते.

- Advertisement -

14 डिसेंबर 2018 रोजी त्यांच्या हॉस्टेलच्या दुरुस्तीसाठी लावण्यात आलेल्या बांबूच्या परातीवरुन चढून एक तरुण त्यांच्या रुममध्ये घुसला होता. त्याने रुममधील दोन मोबाईल आणि कॅश असा ऐवज घेऊन पलायन केले, रात्रीची वेळ असल्याने तिची मैत्रिण सारिका कांबळे हिला आवाज आला. यावेळी तिला बांबूच्या परातीवरुन एक तरुण खाली उतरुन पळून जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर तिने रुमची पाहणी केल्यानंतर दोन मोबाईल आणि काही कॅश चोरीस गेल्याचे दिसून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -