घरमुंबईशिवसेनेच्या पालकमंत्र्यापेक्षा आमदार धनवान

शिवसेनेच्या पालकमंत्र्यापेक्षा आमदार धनवान

Subscribe

ठाणे विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या मैदानात असलेल्या उमेदवारांमध्ये शिवसेनेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे श्रीमंत असल्याचे निवडणुकीच्या शपथपत्रकाने समोर आले आहे. तर भाजपचे आमदार संजय केळकर यांच्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचे निवडणूक आयोगाच्या शपथपत्राद्वारे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाकडे उमेदवाराची दाखल करण्यात येणाऱ्या संपत्तीच्या लेखाजोखातून ही माहिती समोर आली आहे.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कोपरी-पाचपाखाडी मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे ११ वी पास आहेत. त्यांनी ५ करोड ४४ लाख ६४ हजार ७१० रुपयांची जंगम मालमत्ता आणि ११० ग्राम सोन्याचे दागिने असल्याचे नमूद केले आहे. यात अर्मडा, स्कॉर्पिओ, बेलोरो वाहनाचा समावेश आहे. तर शिंदे यांच्यावर १८ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तर दुसरीकडे ओवळा माजिवडा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार आणि उमेदवार प्रताप सरनाईक यांनी मात्र १२६ कोटीची जंगम मालमत्ता असल्याचे स्पष्ट केले आहे. तर प्रताप सरनाईक हे १० वी पस आहेत. आयोगाकडे सादर शपथ पात्रात त्यांनी १२६.२९ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता जाहीर केली असून २१ कोटी ८९ लाख ६९ हजार १६५ रुपयांची जंगम मालमत्ता आणि १०४ कोटी ४० लाख१० हजार २०० रुपयांची मालमत्ता आहे. तर ११० कोटी लाख ५८ हजार १६८ रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याकडे १ कोटी ३५ लाखाची टोयोटो लँड क्रुझर आहे. तर २१ तोळे सोने आहे, त्यांच्यावर ७ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

- Advertisement -

ठाणे शहर मतदार संघातून भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार संजय केळकर हे बीकॉम आहेत. त्यांच्याकडे ३ कोटी ७ लाख ९६ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. ३६ लाख ४७ हजार ४५४ रुपयांची ठावर मालमत्ता आहे. तयांचयावर १ कोटी १२ लाख ९६५ रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याकडे इनोव्हा कर आणि सहा तोळे ५ ग्रामचे सोने आहे, तर त्यांच्या पत्नीकडे २७ तोळे सोने आहे आणि संयुक्त निवास असा १ कोटी १२ लाख रुपयांची संपत्ती आहे. विशेष असे की, संजय केळकर यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. दहावी पास मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांची १ कोटा ४ लाख ९४ हजार २४८ जंगम मालमत्ता आणि ३ कोटी ३७ लाख ८१ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता अशी एकूण ४ कोटी ८२ लाख ७५ हजाराची मालमत्ता आहे. जाधव यांच्यावर २ कोती १ लाख ५८ हजार ९७५ रुपयांचे कर्ज आहे. तसेच ५ लाखाचे हिरे, २७० ग्रामचे सोन्याचे दागिने, १२३० ग्राम चांदीचे दागिने, दुकान, निवास, जमीन आणि पाच हजाराचे शेअर अशी मालमत्ता आहे. त्यांच्यावर १८ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -