घरमुंबईशिवसेना आमदाराचे चिखलात ठिय्या आंदोलन

शिवसेना आमदाराचे चिखलात ठिय्या आंदोलन

Subscribe

मानखुर्द येथे शिवसेना आमदार तुकाराम काते यांनी एमएमआरडीएच्या विरोधात चिखलात बसून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

शिवसेना आमदार तुकाराम काते यांनी मानखुर्द येथे चिखलात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन एमएमआरडी विरोधात करण्यात येत आहे. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये मेट्रो कारशेडच्या कामांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आणि चिखल साचले आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी आपली व्यथा स्थानिक शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्याकडे मांडली. त्यामुळे तुकाराम काते यांनी एमएमआरडीएच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे.

खड्ड्यांमध्ये माती आणून टाकल्यामुळे चिखल

मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर मधील रस्त्याचे बांधकाम एमएमआरडीएने पुर्ण न करता अर्धवट सोडून दिले आहे. तसचे या अर्धवट केलेल्या रस्त्यांवर एमएमआरडीएने माती आणून टाकल्यामुळे सर्वत्र चिखल झाला आहे. आज याच चिखलात स्थानिक शिवसेना आमदार तुकाराम काते यांनी बसून ठिय्या आंदोलन सुरू केले. ते एमएमआरडीएच्या कारभाराविरोधात निदर्शने करत आहेत. एमएमआरडीए रस्त्याचे बांधकाम पुर्ण न करता माती आणून टाकल्यामुळे जो चिखल झाला आहे त्यामुळे महाराष्ट्र नगरातील नागरिकांना मोठा त्रास होत आहे. शाळेत जाणारे लहान मुले या चिखलात पाय घसरून पडत आहेत. महाराष्ट्र नगरच्या नागरिकांनी आपली व्यथा स्थानिक आमदार तुकाराम काते यांना सांगितली. त्यामुळे आमदार तुकाराम काते यांनी थेट चिखलातच बसून ठिय्या आंदोलन सुरू केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -