घरCORONA UPDATEएमएमआरडीएची १३ हजार रेंटल हाऊसिंगची घरे क्वारंटाईनसाठी

एमएमआरडीएची १३ हजार रेंटल हाऊसिंगची घरे क्वारंटाईनसाठी

Subscribe

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा महत्वकांशी प्रकल्प असलेला रेंटल हाऊसिंग स्किमचा प्रकल्प आता कोविड- १९ च्या लढ्यासाठी वापरण्यात येणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा महत्वकांशी प्रकल्प असलेला रेंटल हाऊसिंग स्किमचा प्रकल्प आता कोविड- १९ च्या लढ्यासाठी वापरण्यात येणार आहे. या रेंटल हाऊसिंगच्या जागेचा वापर हा क्वारंटाईनच्या सुविधेसाठी करण्यात येणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रात कोविड-१९ च्या रूग्णांचा वाढता आकडा पाहता आता या जागेचा वापरही क्वारंटाईनच्या सुविधेसाठी करण्यात येणार आहे.

एमएमआरडीएची घरे ही संबंधित यंत्रणांकडे सुपुर्द करण्यात आली आहेत. ही घरे पनवेल, भिवंडी, ठाणे, मीरा-भायंदर तसेच मुंबई महानगर प्रदेशातील विविध भागातील आहेत. एमएमआरडीएने गेल्या काही वर्षात रेंटल हाऊसिंग स्किमअंतर्गत घरे उभारली होती. पण आता कोरोना विरोधातील लढाईत या घरांचा वापर करण्यात येणार आहे. परवडणाऱ्या दरात मुंबई महानगरासारख्या क्षेत्रात घरे भाडेतत्वावर उपलब्ध व्हावीत हा रेंटल हाऊसिंग स्किमचा उद्देश आहे. घर खरेदी करण्याची क्षमता नसणाऱ्या गरीब कुटुंबासाठी या योजनेची सुरूवात एमएमआरडीएने २००८ मध्ये केली होती. त्यानंतर मुंबई महानगर प्रदेशात या योजनेला सुरूवात झाली. नवी मुंबई तसेच माथेरानमध्ये अशा पद्धतीचे प्रकल्प उभारण्यात आले. एमएमआरडीएने आजपर्यंत एकुण ५१ रेंटल हाऊसिंग प्रकल्पांना परवानगी दिली आहे. त्यामधून एकुण ९७ हजार ५७४ घरांची निर्मिती झाली आहे. रेंटल हाऊसिंगच्या घराअंतर्गत ५१ हजार घरे ही महापालिका क्षेत्रात आहेत.

- Advertisement -

एमएमआरडीएसारखीच क्वारंटाईन सुविधेसाठी म्हाडाने देखील ६२५ घरे उपलब्ध करून दिली आहेत. तर झोपडपट्टी पुर्नविकास प्राधिकरण (एसआरए) नेदेखील चेंबुर, अंधेरी, गोरेगाव, मुलुंड यासारख्या भागात २४०० घरे उपलब्ध करून दिली आहेत. सौन्य लक्षणे असणाऱ्या रूग्णांना विलगीकरण करण्यासाठी या घरांचा वापर करण्यात येणार आहे. एमएमआरडीए, म्हाडा आणि एसआरए या तिन्ही यंत्रणांमुळे कोविड- १९ च्या लढाईसाठी मदत मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -