घरमुंबईनिवडणूक जवळ येताच पुन्हा पुलवामा सारखा हल्ला घडवतील; राज ठाकरेंची भाजपवर टीका

निवडणूक जवळ येताच पुन्हा पुलवामा सारखा हल्ला घडवतील; राज ठाकरेंची भाजपवर टीका

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १३ व्या वर्धापन दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर कसून टीका केली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो आणि भाषणे दाखवून त्यांनी टीका केली.

“लोकसभा निवडणुकीच्या तोडांवर पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे राजकारण करण्यात येत आहे. थोडे दिवस थांबा जशी निवडणूक जवळ येईल, तेव्हा पुन्हा एकदा पुलवामा सारखा दहशतवादी हल्ला केला जाईल”, असा धक्कादायक दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. २७ डिसेंबर २०१८ रोजी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची बँकॉकमध्ये गुप्त बैठक झाली. हे दोघेही बँकॉकमध्ये काय करत होते. या दोघांच्या भेटीत असे काय घडले ज्यामुळे एक महिन्यात दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली. पुलवामा हल्ल्यात आमचे ४० जवान मारले गेले. त्यांचे कुटुंबिय टाहो फोडत आहेत, अशा परिस्थितीत आम्ही प्रश्न विचारायचे नाही का? आणि आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवणारे भाजपवाले कोण आहेत? जर पंतप्रधान नरेंद्र मोदी खरे राष्ट्रभक्त असते तर तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफला केक भरवायला पाकिस्तानात का गेले असते? असे प्रश्न राज ठाकरे यांनी आज उपस्थित केले.

हाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १३ वा वर्धापन दिन वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर चौफेर टिकास्त्र सोडले. तसेच आगामी लोकसभेत निवडणूक लढवायची की नाही? याबाबतची सविस्तर भूमिका आचारसंहिता लागल्यावर उघड करणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच मला दोन-चार जागा द्या, असे म्हणायला मी काही प्रकाश आंबेडकर नाही, असे सांगून त्यांनी वंचित बहुजन आघाडीला देखील टोला हाणला.

- Advertisement -

भाजपच्या ट्रोलर्सना घरातून बाहेर काढून मारा

“निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोशल मीडियाचा मोठा वापर करेल. भाजपच्या ट्रोलिंगला मी भीक घालत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयटी सेक्टरमधील लावारीसांना मी घाबरत नाही. दिवाळीला सुतळी बॉम्ब फुटला तरी यांची फाटते आणि हे कट्ट्यावर बसून युद्धाची भाषा करतात. डोकलामचा वाद सुरु असताना भाजपचे ट्रोलर्स चायनिज वस्तूंवर बंदी आणण्यासाठी सर्वांना धमकावत होते. मग भाजपने सरदार वल्लभभाईंचा पुतळा कुठे बनवला? हे सुद्धा जाहीर करावे. भाजपची आता खूप नाटके झाली आहेत. आता भाजपच्या ट्रोलर्सनी शिव्या घातल्या तर त्यांना घरातून बाहेर काढून मारा. जे मेसेजेस फॉरवर्ड करणारे ढकले असतील त्यांच्यावरही नजर ठेवा, असा इशाराचा ठाकरे यांनी भाजपच्या आयटी टीमला दिला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर देशाच्या प्रत्येक भागात चर्चा सुरु होती. पाकिस्तानला संपवला पाहिजे, अशा प्रकारच्या चर्चा सुरु होत्या. मात्र नरेंद्र मोदींना याचे दुःख नव्हते. हल्ल्यानंतर मोदी स्टाईलीस्ट कपडे आणि तोंडावर हास्य ठेव असतानाचे फोटो द टेलिग्राफ या वृत्तपत्राने छापले आहेत. देशातील पत्रकारितेला हे धोक्याचे दिवस आहेत. देशातील लोक एका विश्वासाने बातम्या वाचत असतात मात्र नंतर समजते ही माणसे विकली गेलेली आहेत, ही परिस्थीती खरंच गंभीर आहे. २०१५ ला कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या आधी मी बोललो होतो की लोकसभेच्या तोंडावर हे युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील. मी ज्योतिषी नाही पण भाजप काय-काय करू शकतो? याचा मला अंदाज आहे, असेही ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -