घरमुंबईघर मराठी माणसालाच विका, 'आपलं ठाणे, मराठी ठाणे’, मनसेचे होर्डिंग

घर मराठी माणसालाच विका, ‘आपलं ठाणे, मराठी ठाणे’, मनसेचे होर्डिंग

Subscribe

मराठी विरूद्ध गुजराती वादानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून ठाण्यात 'आपलं ठाणे, मराठी ठाणे', असे होर्डिंग लावले असून हा विषय चर्चेचा बनला आहे.

ठाण्यातील मराठी विरूद्ध गुजराती वादानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपल घर- मालमत्ता मराठी माणसालाच विका. ‘आपलं ठाणे, मराठी ठाणे’, असे होर्डिंग लावल आहे. लढा ठाण्याच्या मराठी माणसाचा असा आशय या होर्डिंगवर आहे. त्यामुळे मनसेचे हे होर्डिंग चर्चेचा विषय बनला आहे.

घर आणि मालमत्ता मराठी माणसाला विका

काही दिवसांपूर्वीच नौपाडा येथील सोसायटीत एका क्षुल्लक कारणावरून मराठी आणि गुजराती कुटूंबामध्ये वादावादी झाली होती. हसमुख शहा आणि राहुल पैठणकर या दोघांमध्ये हा वाद होऊन शहा यांनी राहुलला बेदम मारहाण केली होती. तसेच सोसायटीत राहण्याची तुमची लायकी नाही, अशी अवहेलना केली होती. राहुलला बेदम मारहाण केल्याचा सीसी कॅमेऱ्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. त्यानंतर काहींना या घटनेला मराठी विरूध्द गुजराती असा रंग दिला होता. या प्रकारानंतर मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी हसमुख शहा यांचा शोध घेऊन त्यांना कान पकडून मराठी माणसाची माफी मागायला लावली होती. तसेच मनसे स्टाईल त्यांचा समाचार घेतला होता. या घटनेला ठाण्यात मराठी विरूद्ध गुजराती, असे वळण लागल्यानंतर गुजराती समाजाने पत्रकार परिषद घेऊन हा वैयक्तीक वाद असून गुजराती समाजाचा कोणताही संबध नसल्याचा खुलासा केला होता. तसेच ठाण्यात मराठी आणि गुजराती समाज अनेक वर्षे एकोप्याने राहत असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, ठाण्यात मराठी माणसाला घर भाडयाने मिळणेही मुश्किल झाले आहे. नौपाडयातील विष्णुनगर हा मराठी भाषिक परिसर आहे. मराठी गुजराती वादानंतर मनसेने आपल घर- मालमत्ता मराठी माणसालाच विका, असे आवाहन करणारे पोस्टर लावल्याने या बॅनरची चर्चा चांगलीच रंगली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘हा’ वैयक्तिक वाद असून गुजराती समाजाचा संबंध नाही


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -