Raj Thackeray Ayodhya Visit : राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित; पुण्यातील सभेतून भूमिका करणार स्पष्ट

MNS raj thackeray ayodhya visit cancel know why Raj Thackeray tweet
Raj Thackeray Ayodhya Visit राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तुर्तास स्थगित

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 5 जून रोजी होणारा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित झाला आहे. राज ठाकरेंनी स्वत: ट्विट करत तूर्तास दौरा स्थगित केल्याची माहिती दिली आहे. तसेच 22 मे रोजी सकाळी 10.00 वाजता पुण्यातील गणेश कला क्रिडा केंद्रात यावर सविस्तर बोलूच असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. सध्या दौरा स्थगित झाल्याने राज ठाकरे पुण्यातील सभेतून अयोध्या दौऱ्याची नवी तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राज ठाकरे शिवतीर्थावर मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक किंवा पत्रकार परिषद घेत दौरा रद्द करण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचीही शक्यता आहे.

दरम्यान राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी विरोध केला होता. उत्तर भारतीयांचा अपमान केल्याबद्दल राज ठाकरेंनी जाहीरपणे माफी मागितल्याशिवाय त्यांना उत्तर प्रदेशात येऊ दिले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता.

राज ठाकरेंनी आपल्या भाषणांमधून उत्तर भारतीय जनतेचा अपमान केल्याचा आरोप बृजभूषण सिंह यांनी केला, यामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा अधिकचं चर्चेत आला होता. (Ayodhya Tour) मात्र आता राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित झाल्याची माहिती समोर येत आहे,.

यापूर्वी मुंबईतील लालबाग परिसरात मनसेकडून पोस्टरबाजी करत इशारा देण्यात आला होता. पोस्टरमध्ये लिहिले होते की, राज ठाकरेंना कोणी दुखपत करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र संतापाने पेटून उटेल, त्याचवेळी राज ठाकरेंच्या दौऱ्याची माहिती मिळताच उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी राज ठाकरेंविरोधात निदर्शने सुरु झाली आहेत.

भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय-ए) प्रमुख रामदास आठवले यांनीही राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला आहे. अयोध्येला जाण्यापूर्वी त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान अयोध्या दौरा स्थगितीबाबत राज ठाकरे पुण्यातील सभेतून स्पष्टीकरण देतील. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या तयारीला सुरुवात झालेली नाही. तसेच रेल्वेचं आरक्षणही झालेलं नाही. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही, यासाठी राज ठाकरेंचा 5 जूनचा दौरा स्थगित झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एकीकडे राज ठाकरेंना विरोध होत असताना दुसरीकडे कांचनगिरी यांनी त्यांची बाजू घेतली. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना रोखूनच दाखवावं, असं म्हणत राज ठाकरेंची बाजू घेतली होती. यावेळी राज ठाकरेंते तोंडभरुन कौतुकही केलं होतं.