घरमुंबईमनसेने उडवली शिवसेनेच्या वाघाची खिल्ली

मनसेने उडवली शिवसेनेच्या वाघाची खिल्ली

Subscribe

शिवसेनेने भाजपसोबत युती केल्यामुळे राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर शिवसेनेची खिल्ली उडवली जात आहे. कालपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेवर टीका केली होती. आता या टीकेच्या लढाईत मनसेने देखील उडी मारली आहे.

शिवसेना-भाजपा युती होऊन दोन दिवस उलटले तरी शिवसेनेवर चहूबाजूने होणारी टीका मात्र थांबताना दिसत नाही. एकीकडे नेटकरी सोशल मीडियावर शिवसेनेला धु..धु..धूत असताना राजकीय पक्षही यात मागे नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठोपाठ मनसेने देखील शिवसेनेच्या वाघाला पोस्टर मधून डिवचले आहे. मातोश्री बाहेर मनसेने शिवसेनेची खिल्ली उडवणारा बॅनर लावला आहे.

काय आहे या बॅनरमध्ये?

या बॅनर मध्ये वाघ आणि सिंह दाखवण्यात आला असून, ‘वाघाची सिहाला मिठी…सत्ताकारणासाठी’ असे लिहिण्यात आले आहे. दरम्यान ‘शिवसेना-भाजप युती हिंदुत्त्वासाठी, देशप्रेमासाठी’ नाही तर ‘ही युती राजकीय स्वर्थासाठी, सत्ताप्रेमासाठी’ असल्याचा आरोप मनसेचे अखिल चित्रे यांनी केला आहे. दरम्यान काल शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी सेना भवन समोर अमित शाह-उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना मारलेल्या मिठीचे शिवसेना भवनसमोर भले मोठे होर्डिंग्स लावले होते. शिवसेना-भाजप युती हिंदुत्वासाठी, देशप्रेमासाठी केल्याचे या हॉर्डिंगवर लिहिण्यात आले होते. त्यालाच मनसेने आज हिर्डिंग लावून उत्तर दिले आहे.

- Advertisement -

सामनातून शिवसेनेची सारवासारव

सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर युतीची घोषणा करण्यात आली. मध्यंतरी शिवसेना आणि भाजपमधील संबंध फार ताणले गेले होते. उद्धव ठाकरेंनी भाजप सोबत युती न करण्याचा निर्णय घेतला होता. तर अमित शहांनीही ‘शिवसेना को पटक देगें’ अशी भाषा वापरली होती. त्यामुळे युती होणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, एवढं सारं होऊनही शिवसेनेने युती केली. त्यामुळे शिवसेनेची सगळीकडून खिल्ली उडवली जात आहे. आता तर मनसेनेही शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. दरम्यान, युती संबंधात शिवसेनेने ‘सामना’ अग्रलेखामध्ये सारवासारव केली आहे. भाजपसोबत आमचे कुठलेही वैर नव्हते असे अग्रलेखात म्हटले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -