घरमुंबईमनसे विधानसभा लढणार? उद्या होणार राज गडावर बैठक

मनसे विधानसभा लढणार? उद्या होणार राज गडावर बैठक

Subscribe

मनसे पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार की नाही याविषयी अजूनही निश्चित निर्णय झाला नसून याबाबत उद्या राज गडावर बैठक होणार आहे.

लोकसभा निवडणुकीतून माघार घेणार्‍या राज ठाकरे यांचा मनसे पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार की नाही, याविषयी अजूनही निश्चित निर्णय झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर मुंबईत शुक्रवारी दुपारी १२ वाजता मनसेच्या मुंबई विभाग अध्यक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक राज गडावर राज ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या बैठकीला मनसे अध्यक्ष उपस्थित राहणार असून या बैठकीत मनसे विधानसभा लढणार का यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

राज ठाकरे विधानसेभेचा निर्णय उद्या सांगणार

विधानसभा निवडणूक लढवायची की नाही यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना संभ्रमात पडले आहेत. मनसेने २०१९ मधील लोकसभा निवडणूकही लढवली नव्हती. मात्र, विधानसभा निवडणुक लढवणार का याकडे सर्वांचे लक्ष रागून राहिले आहे. तसेत हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आगामी विधानसभा लढवायची कि नाही यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी राज गडावर एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत विधानसभा निवडणूक लढवायची की नाही यावर चर्चा होणार आहे. मात्र, निर्णय काय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच योग्य वेळी राज ठाकरे निर्णय जाहीर करतील असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले होते. त्याप्रमाणे उद्या विधानसभेचा निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मनसे विधानसभा निवडणूकीत ५० ते ६० जागा लढणार?


राज ठाकरेंच्या या शब्दांने भरली धडकी

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत न उतरताही प्रचारात चांगलीच रंगत भरली होती. राज ठाकरेंनी दहा सभा घेऊन मोदी आणि भाजपच्या जाहीरातबाजीचे व्हिडिओ सभांमधून दाखवले होते. ‘लाव रे तो व्हिडिओ’ असे शब्द राज ठाकरेंच्या तोंडून बाहेर पडले की सत्ताधाऱ्यांना धडकी भरावी, एवढी दहशत या शब्दांनी निर्माण केली होती. लोकांनीही राज ठाकरेंच्या या व्हिडिओंना भरभरून प्रतिसाद दिला. मात्र, प्रत्यक्षात या सभांचा काहीही परिणाम झाला नाही हे लोकसभा निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक निकालाबाबत ‘अनाकलनीय’ अशी एका शब्दाची प्रतिक्रियाही दिली होती. आता विधानसभा निवडणूक मनसे लढवणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -