घरमुंबईमुंबईकरांसाठी खुशखबर; तानसा पाठोपाठ मोडकसागर ‘ओव्हरफ्लो’

मुंबईकरांसाठी खुशखबर; तानसा पाठोपाठ मोडकसागर ‘ओव्हरफ्लो’

Subscribe

तुळशी, तानसा या तलावांपाठोपाठ मोडकसागर तलावही ‘ओव्हरफ्लो’ झाले आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या तुळशी, तानसा या तलावांपाठोपाठ मोडकसागर तलावही शुक्रवारी संध्याकाळी सव्वा पाच वाजता ओसंडून भरुन वाहू लागले. त्यामुळे एकूण सात तलावांपैकी तीन तलाव भरल्याने मुंबईकरांसाठी खुशखबर असली तरी मुंबईला ६० टक्क्यांहून अधिक पाणी पुरवठा करणार्‍या भातसा तलावांमध्ये अद्यापही ५० टक्के एवढाच पाणी साठा जमा झाला आहे.

यंदा तानसा तलाव पहिले भरले

गेल्या दोन दिवसात ठाणे तसेच नाशिक भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी तानसा तलाव भरले. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी मोडक सागर तलावही भरले. दरवर्षी मोडक सागर तलाव प्रथम भरते आणि त्यानंतर तानसा तलाव भरले जाते. परंतु, यावर्षी तानसा तलाव पहिले भरले, त्यानंतर दुसर्‍या दिवशी मोडक सागर भरले. मागील मोडगसार तलाव १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजताच भरले होते.

- Advertisement -

मुंबईला पाणी पुरवठा कराणारे तलाव

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांमधून दरदिवशी ३ हजार ७५० दशलक्ष लिटर्स एवढा पाण्याचा पुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी या सर्व धरण तथा तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर्स एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. मात्र, २६ जुलै २०१९ रोजी या सर्व तलावांमध्ये ९ लाख २८ हजार ३२६ दशलक्ष लिटर्स एवढा पाणीसाठा जमा झालेला आहे. मात्र, मागील दोन वर्षांच्या तुलनेत अजूनही १८ ते २० टक्के पाणी साठा कमी आहे.


हेही वाचा – तानसा भरले, पण पाण्याची चिंता कायमच!

- Advertisement -

एकाच दिवसांत तलावात ७ मीटरने पाणी पातळी वाढली

थेंबे थेंबे तळे साचे अशी परिस्थिती असलेल्या मुंबईला पाणी पुरवणाऱ्या सर्व तलावांमध्ये एकाच दिवशी पाण्याची पातळी ७ मीटरने वाढली आहे. या सर्व तलावांमध्ये गुरुवारी ५६.८७ टक्के एवढा साठा होता, त्या तुलनेत शुक्रवारी ६४.१४ एवढा पाणी साठा जमा झाला आहे.

२६ जुलै पर्यंतचा पाणी साठा

  • २०१९ :  ९लाख २८ हजार ३२६ दशलक्ष लिटर्स  (६४.१४ टक्के)
  • २०१८ :  ११लाख ९१ हजार ७५४ दशलक्ष लिटर्स (८२.३४टक्के)
  • २०१७ :  १२ लाख २१ हजार ६८२ दशलक्ष (८४.४१ टक्के)

    हेही वाचा – तानसा धरण ‘ओव्हरफ्लो’


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -