घरमुंबईमोदींनी सुशासन प्रक्रिया विचारपूर्वक अंमलात आणली

मोदींनी सुशासन प्रक्रिया विचारपूर्वक अंमलात आणली

Subscribe

भाजपा कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे प्रतिपादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसहभाग, तंत्रज्ञान यांच्या मदतीने सुशासनाची प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने अंमलात आणली असून याचे अनेक चांगले परिणाम दिसून येत आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मंगळवारी केले. प्रदेश भाजपतर्फे आयोजित केलेल्या बुद्धिवंतांच्या मेळाव्यात नड्डा बोलत होते.
भारतीय जनता पक्षाने सुशासन ही संकल्पना अत्यंत विचारपूर्वक स्वीकारलेली आहे आणि तितक्याच विचारपूर्वक राबविली आहे. गुजरातमध्ये अनेक वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना नर्मदेचे पाणी साबरमती नदीत आणले गेले. या पाण्याचे वाटप शेतीला कसे करायचे याचा अधिकार मोदींनी तेथील महिला मंडळांना दिला. लोकसहभागातून मोदींनी महिला मंडळांद्वारे नर्मदेच्या पाण्याचे अत्यंत योग्य पद्धतीने वाटप केले.

नरेंद्र मोदी हे कायमच सरकारी निर्णय प्रक्रियेत सामान्य माणसाला विविध पद्धतीने सहभागी करून घेण्याची गरज सातत्याने व्यक्त करीत असतात. असाच प्रयोग महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबाजवणीतही लोकसहभाग महत्वाचा ठरला. भूगर्भातील पाण्याचे संवर्धन करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी अत्यंत परिणामकारक पद्धतीने करण्यात आली. सामान्य माणसांनी या योजनेसाठी आपल्या जमिनीही दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य जनतेचा सरकारी निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढावा यासाठी mygov.in नावाचे संकेतस्थळ सुरु केले आहे. सरकारला एखाद्या विषयाबाबत कोणताही सामान्य माणूस आपले मत कळवू शकतो. या पोर्टलद्वारे आपण आपली मते, सूचना थेट पंतप्रधांनांना कळवू शकतो. या पोर्टलवर केल्या गेलेल्या अनेक सूचनांची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. अनेक जण या पोर्टलवर तक्रारी करतात. अनेकांच्या तक्रारी या पोर्टलच्या माध्यमातून सोडविण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सधन वर्गाला गॅसवरील सबसिडी सोडण्याचे आवाहन केले. या आवाहनाला एक कोटीहून अनेक नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वे प्रवासासाठी मिळणारी सवलत सोडावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या आवाहनालाही सामान्य माणसांनी मोठा प्रतिसाद दिला आहे, असेही नड्डा यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -