घरमुंबईआईमुळे नऊ महिन्यात बाळाचा दुसर्‍यांदा जन्म

आईमुळे नऊ महिन्यात बाळाचा दुसर्‍यांदा जन्म

Subscribe

जन्मत:च पित्ताशयाचा त्रास असल्याने यकृत खराब झालेल्या नऊ महिन्याच्या मुलाला आईने दिलेल्या यकृतामुळे अवघ्या नऊ महिन्यातच त्याचा दुसर्‍यांदा जन्म झाला. नऊ महिन्यांच्या बाळाचे यकृत बदलण्याची पहिलीच घटना असल्याचे हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितले. मुंबईतील व्हॉकार्ट हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

जन्मत:च पित्ताशयाचा त्रास असल्याने यकृत खराब झालेल्या नऊ महिन्याच्या मुलाला आईने दिलेल्या यकृतामुळे अवघ्या नऊ महिन्यातच त्याचा दुसर्‍यांदा जन्म झाला. काव्य राऊत या बालकावर मुंबईतील व्हॉकार्ट हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली. नऊ महिन्यांच्या बाळाचे यकृत बदलण्याची ही पहिलीच घटना असल्याचे हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितले.

पालघर येथे राहणारे विवेक व निशा राऊत या रोजंदारीवर काम करणार्‍या जोडप्याला नऊ महिन्यांपूर्वी काव्य हा गोंडस मुलगा झाला. पण या मुलाला जन्मापासूनच पचनाचा त्रास होत होता. त्याने खाल्लेला कोेणताही पदार्थ न पचताच बाहेर टाकला जात असे. त्यामुळे चिंतीत झालेल्या राऊत पती-पत्नींनी काव्यला डॉक्टरला दाखवले. त्यावेळी त्याला यकृताचा बिलिअरी आर्टेसिया व काविळ झाल्याचे समजले. बिलिअरी आर्टेसियामुळे यकृत खराब होते. त्यामुळे यकृत प्रत्यारोपण करावे लागते. पण काव्य अवघ्या दोन महिन्याचा असल्याने व यकृत प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया करण्यासाठी साधारण दीड ते दोन वर्षे पूर्ण होण्याची गरज असते तसेच त्याचे वजन ७ किलोपेक्षा अधिक असण्याची गरज असते. पण यकृत खराब होऊ नये यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

ही शस्त्रक्रिया अयशस्वी ठरल्याने अखेर यकृत प्रत्यारोपण करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांनी बाळाचे वजन वाढवण्याबरोबरच यकृतदाता शोधण्यास सुरुवात केली. पण काव्यच्या आईने यकृतदान करण्याचा निर्णय घेतल्याने एक प्रश्न मिटला. पण त्याचे वजन ५.६ किलो होते. त्यातच त्याला काविळ व पोटात पाणी झाल्याने अखेर शस्त्रक्रियेचा निर्णय घेतल्याचे व्हॉकार्ट हॉस्पिटलमधील अ‍ॅबडोमिनल अवयव प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. अनुराग श्रीमल यांनी सांगितले.

निशा यांचे २१० ग्रॅमपर्यंत यकृत काढून ते काव्यला बसवण्यासाठीची शस्त्रक्रिया १४ जूनला करण्यात आली. ही शस्त्रक्रिया तब्बल १५ तास चालली. या शस्त्रक्रियेसाठी २० लाख खर्च आला असून, हा सर्व खर्च हॉस्पिटलमधील समाजसेवकांकडून करण्यात आला आहे. काव्य व त्याच्या आईची तब्येत व्यवस्थित असून, लवकरच त्यांना घरी सोडण्यात येईल, असे पिडिअ‍ॅट्रिक हेपेटॉलॉजिस्ट डॉ. ललित वर्मा यांनी सांगितले.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -