घरताज्या घडामोडीविमा कंपन्यांकडून साडे २७ लाखांची उकळली बोगस बिले

विमा कंपन्यांकडून साडे २७ लाखांची उकळली बोगस बिले

Subscribe

औषध दुकानदार आणि हॉस्पिटल मालकांवर एफडीएकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलुंडमधील औषध दुकानदाराने आणि हॉस्पिटलच्या मालकाने रुग्णाला विम्याच्या बनावट बिलाचा पुरवठा केला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. औषध विक्रेता आणि हॉस्पिटल दुकानदार यांच्या विरोधात राज्य अन्न आणि औषध प्रशासन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या मुंबई झोन या विभागात ही घटना घडली. या प्रकाराविरोधात औषध निरीक्षकांना प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगांने चौकशी केली असता हा प्रकार समोर आला. मुलुंड एमजी रोड वरील मे. सारथी हॉस्पिटलमध्ये मेडिक्लेम आणि कॅशलेस अंतर्गत ज्या रुग्णावर उपचार करण्यात येतात. त्या रुग्णांना पुरवठा करण्यात आलेल्या औषधांच्या खरेदी देयकांमधील औषधेच अस्तित्वात नसल्याचे उघडकीस आले.

मालकाच्या खात्यावर २७ लाख रुपये जमा असल्याचे आढळले

एकूण २७ लाख ५६ हजार ८०५ रुपये किंमतीची ही बोगस देयके विमा कंपन्यांकडून दाखवून पैशाची उकळणी केली. मुलुंड विणा नगरच्या श्री गणेश मेडिकल दुकानाच्या नावे ही सर्व खरेदी बिले आढळून आली. श्री गणेश मेडिकल स्टोअर्स मालक देवीसिंग भाटि यांच्या खात्यावर एकूण २७ लाख रुपये जमा झाल्याचे सुद्धा आढळले. तथापि ही बनावट बिले श्री गणेश मेडिकल स्टोअर्सचे नियमित बिलांपेक्षा वेगळी असल्याचेही आढळले.

- Advertisement -

आर्थिक फायद्यासाठी विमा कंपन्यांची दिशाभूल

ही बिले कॉम्प्युटर सॉफ्टवेअरवर तयार करण्यात आली नसल्याचेही समोर आले. तसेच, खरेदी बिलातील औषधांचे समुह क्रमांक संबंधित औषधांच्या उत्पादकांकडून पडताळली असता समुह क्रमांकांचा साठा उत्पादकांनी उत्पादितच केले नसल्याचेही समजले. प्रत्यक्षात औषधे पुरवठा न करता आणि रुग्णांवर या औषधांचा वापर न करता श्री गणेश मेडिकल स्टोअर्सचे मालक आणि मे. सारथी हॉस्पिटल यांनी संगनमताने आर्थिक फायद्यासाठी विमा कंपन्यांची दिशाभूल करण्यात आली असल्याचा गुन्हा मुलुंड पोलीस ठाण्यात मेडिकल स्टोअर्स मालक देवीसिंग भाटि आणि मे. सारथी हॉस्पिटलचे मालक यांच्याविरोधात औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -