धक्कादायक! रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्याने दिले चुकीचे इंजेक्शन; दुसऱ्या मिनिटाला चिमुरड्याने गमावला जीव

मुंबईतील गोवंडीच्या बैगनवाडीमधील नर्सिंगहोममध्ये चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे दोन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Mumbai 2-year-old dies after wrong injection by hospital sweeper
धक्कादायक! रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्याने दिले चुकीचे इंजेक्शन; दुसऱ्या मिनिटाला चिमुरड्याने गमावला जीव

एका नर्सिंग होमच्या सफाई कर्मचाऱ्याने चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे दोन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आहे. मुंबईतील गोवंडीच्या बैगनवाडीमधील नर्सिंगहोममध्ये ही घटना घडली. याप्रकरणी काल, गुरुवारी शिवाजी नगर पोलिसांनी चार कर्मचारी, सफाई कर्मचारी, एक डॉक्टर, एक निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO) आणि एक नर्स यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, आरोपी सफाई कर्मचारी १७ वर्षांचा असल्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी बाल न्याय कायदा लागू केला आहे. याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जानेवारीला दोन वर्षीय चिमुरडा ताहा खानला ताप असल्यामुळे बैनगवाडीतील नूर नर्सिंग होम दाखल केले होते. डॉक्टराने घरी जाण्यापूर्वी आरएमओला एका १६ वर्षीय रुग्णाला एजिथ्रोमाइसिनचे औषधाचे इंजेक्शन देण्यास सांगितले होते.

पण आरएमओ त्यादिवशी उपस्थित नसल्यामुळे त्याने नर्सला लहान मुलांना औषध देण्यास सांगितले. त्यावेळेस सफाई कर्मचाऱ्याने नर्सला गोळ्या आणि इंजेक्शन आपण एकत्र देऊ असे सांगितले. मग यादरम्यान १६ वर्षीय रुग्णाचे इंजेक्शन सफाई कर्मचाऱ्याने दोन वर्षांच्या चिमुरड्याला दिले आणि अवघ्या काही मिनिटांत त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आरोपींवर कलम ३०४ (II) नुसार दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – ५ वर्षे फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात