घरताज्या घडामोडीMumbai Air Quality: दिवाळीत मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली, फटाक्यांमुळे वातावरण प्रदूषित

Mumbai Air Quality: दिवाळीत मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली, फटाक्यांमुळे वातावरण प्रदूषित

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून फटाके मर्यादीत प्रमाणात फोडण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच अधिक आवाजाच्या फटक्यांवर निर्बंध घालण्यात आले होते. यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत अधिक कमी फटाके फोडले गेले तरीही मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. मुंबईत रात्री १० वाजेपर्यंत फटाके फोडण्याचा वेळ देण्यात आला होता काही ठिकाणी या नियमाचे उल्लंघन करुन १० नंतरही रात्रभर तसेच पहाटेपर्यंत मुंबईत फटाक्यांचा आवाज येत होता.

मुंबईत आवाज फाऊंडेशन या एनजीओने दिलेल्या माहितीनुसार बांद्रा, माहिम, वरळी, दादर, शिवाजी पार्क, बाबुलनाथ आणि मरीन ड्राईव्ह परिसरात मागील वर्षीपेक्षा यंदा कमी फटाक्यांच्या आवाजाची नोंद करण्यात आली आहे. आवाज फाऊंडेशनच्या अहवालानुसार जास्तीत जास्त १००.४ डेसिबल आवाजाची नोंद ही शिवाजी पार्कमध्ये रात्री ९.०४ वाजता करण्यात आली आहे. त्यावेळी शांतता प्रवण श्रेत्र असलेल्या शिवाजी पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यासाठी लोकं जमले होते. ते सलग फटाके १० वाजल्यानंतरही फटाके फोडत होते त्यावेळी तिथे एकही पोलीस अधिकारी उपस्थित नव्हते असे आवाज फाऊंडेशनच्या सुमैरा अब्दुलअली यांनी सांगितले.

- Advertisement -

मुंबईतल मरीन ड्राईव्ह हे फटाके फोडण्याचे केंद्रस्थान असताना २०२० च्या तुलनेत यंदाच्या वर्षी शांतता पाहायला मिळाली. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही होता. अब्दुलअली म्हणाल्या की, शहरात अनेक ठिकाणी आवाजाची चाचणी करण्यात आली जिथे किरकोळ फटाके रात्रभर फोडण्यात आले. यंदा नागरिकांनी अधिक प्रमाणात ग्रीन फटाक्यांचा वापर केला ज्याचा आवाज पारंपारिक फटाक्यांच्या तुलनेत कमी असतो. यामध्ये स्पार्कल, चक्री, अनार-पाऊस अशा फटाक्यांचा समावेश अधिक होता.

आवाज फाऊंडेशनच्या अहवालानुसार दिवाळीच्या दिवशी शिवाजी पार्क, दादर परिसरात १००.४ डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली. जी नियमानुसार आवाजाच्या मर्यादेपेक्षा आणि आवाज मोजण्याच्या यंत्राच्या मार्यादेपक्षा जास्त आहे. मागील वर्षी मुंबई महानगरपालिकेनं कोरोनाच्या भीतीने नागरिकांना फटाके न फोडण्याचे आवाहन करत १० वाजेपर्यंत फटाके फोडण्याचा वेळ दिला होता. परंतु त्याला आळा बसला नसल्यामुळे रात्रभर फटाके फोडण्यात आले. मागील वर्षी शिवाजी पार्कमध्ये १००.५ डेसिबल एवढ्या आवाजाची नोंद करण्यात आली होती.

- Advertisement -

मुंबईत आतापर्यंत सर्वाधिक फटाक्यांच्या आवाजाची नोंद ही २०१९ मध्ये ११२.३ डेसिबल, २०१८ मध्ये ११४.१ डेसिबल,२०१७ मध्ये ११७.८ डेसिबल एवढी करण्यात आली होती. त्या तुलनेत यंदाच्या वर्षी कमी करण्यात आली आहे.

हवेची गुणवत्ता घसरली

दिवाळीच्या दिवसांत मुंबईत हवेची गुणवत्ता घसरली आहे. मागील ३ दिवसांतील मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा अहवाल हा धक्कादायक आहे. आवाज फाऊंडेशनच्या अहवालानुसार बांद्रा येथे दुपारी ४.१६ वाजता फटाके न फोडता पीएम २.५ चा निर्देशांक हा ७४µ/mg3 होता. आवाज फाऊंडेशनने हवेची गुणवत्ता मोजमाप करणाऱ्या यंत्राद्वारे गुणवत्ता मोजली आहे.

सिस्टम एयर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) नुसार भूवैज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत हवेची गुणवत्ता मोजण्यात आली. गुरुवारी हवेची गुणवत्ता मध्यम होती तर शुक्रवारी खराब आणि अत्यंत खराब श्रेणीमध्ये घसरण झाली. मुंबईमध्ये गुरुवारी १६२ मध्यम हवेची गुणवत्ता होती ती शुक्रवारी खराब श्रेणीमध्ये गेली. तर गुरुवारी कुलाबामध्ये खराब, बीकेसी हवेची गुणवत्ता खराब, माजगावमध्येही हवेची गुणवत्ता खराब नोंदवण्यात आली. तर शुक्रवारी या तीनही शहरांत अत्यंत खराब श्रेणीमध्ये हवेची गुणवत्ता होती. अंधेरीतही अशाच प्रकारे गुरुवारी मध्यम तर शुक्रवारी खराब हवेच्या गुणवत्तेची नोंद करण्यात आली आहे.


हेही वाचा :  Edible oil: ऐन सणासुदीच्या दिवसांत केंद्राचा सर्वसामान्यांना दिलासा, खाद्यतेल होणार स्वस्त


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -