घरताज्या घडामोडीEdible oil: ऐन सणासुदीच्या दिवसांत केंद्राचा सर्वसामान्यांना दिलासा, खाद्यतेल होणार स्वस्त

Edible oil: ऐन सणासुदीच्या दिवसांत केंद्राचा सर्वसामान्यांना दिलासा, खाद्यतेल होणार स्वस्त

Subscribe

देशातील वाढत्या महागाईमध्ये नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहे. केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्वसंध्येला पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यावर आता खाद्यतेलाची किंमत कमी कऱण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कच्चा तेलावरील मुलभूत कर (बेसिक ड्यूटी) २.५ टक्क्यांवरुन शून्य केली आहे. तसेच कृषी उपकरही कमी करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये कच्चे पाम तेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चा सूर्यफूल तेलाचा समावेश आहे.

केंद्र सरकारच्या अन्न आणि वितरण विभागाचे सचिव सुधांशु पांड्ये म्हणाले की, मागील काही दिवसांपासून देशातील खाद्य तेलाच्या किंमतीमध्ये २० रुपयांची घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाची किंमत जास्त असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या भागीदारीमुळे दिवाळीच्या सणादरम्यान तेलाची किंमत कमी करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये पाम तेल ६ रुपये, सोयाबीन तेल ५ रुपये आणि सूर्यफूल तेल १० रुपये प्रति लिटर कमी झाले आहे. तसेच देशातील काही भागात खाद्य तेलाच्या किंमती २० रुपयांनी कमी झाल्या असल्याची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने कृषी उपकर कच्चा पाम तेलावर २० टक्के होता तो आता ७.५ टक्के केला आहे. तर कच्चा सोयाबीन तेलावरील आणि सूर्यफूलाच्या तेलावर ५ टक्के करण्यात आला आहे. तसेच पामोलिन तेल, रिफाइंड सोयाबीन आणि रिफाइंड सनफ्लॉवर तेलाचे मूळ शुल्क सध्याच्या ३२.५ टक्क्यांवरुन १७.५ टक्के करण्यात आले आहे. केंद्र सरकारने या तेलांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तेलाच्या आयातीमध्ये आकारला जाणाऱ्या शुल्कावर नियंत्रण ठेवलं आहे. अन्न सचिव सुधांशू पांड्ये म्हणाले की, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी अनेक कंपन्यांनी तेलाच्या किंमतीमध्ये घट केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढलेलं दिसतंय, चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -