Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Airport Maintenance: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दुरुस्ती आणि देखभालीसाठी आज 6 तास बंद

Airport Maintenance: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दुरुस्ती आणि देखभालीसाठी आज 6 तास बंद

Subscribe

विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Mumbai Airport Maintenance) दोन्ही धावपट्ट्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी आज (2 मे) रोजी बंद राहणार आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 5 या कालावधीत बंद राहणार आहे.

विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Mumbai Airport Maintenance) दोन्ही धावपट्ट्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी आज (2 मे) रोजी बंद राहणार आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 5 या कालावधीत बंद राहणार आहे. दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी विमानतळ बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी 800हून अधिक विमानसेवांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (mumbai airport maintenance chhatrapati shivaji international airport closed for six hours today)

मिळालेल्या माहितीनुसार, हवाई दलाकडून छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या दुरूस्तीच्या कामातील महत्त्वाच्या टप्प्याचे काम आज हाती घेण्यात येणार आहे. विमानतळावरील दोन्ही धावपट्टी (09/27 आणि 14/32) दुरुस्तीच्या कामासाठी सहा तास बंद राहणार आहे.
परंतु, विमानतळ प्रशासनाच्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 6 नंतर पुन्हा विमानांच्या उड्डाणांना पुन्हा सुरुवात होणार आहे.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त सिंगल रनवे विमानतळ आहे. दिवसभरात या विमानतळावरून 900 विमानांचे उड्डाण होते. अशा परिस्थित विमानतळ 6 तासांसाठी बंद राहणार असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबई विमानतळावर देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानांची वर्दळ वाढली असून प्रवासी संख्येतही वाढ झाली.

दरम्यान, मुंबई विमानतळाने विमान कंपन्या, विमान वाहतूक प्राधिकरण आणि त्याच्या अनेक भागधारकांच्या मदतीने दुरुस्ती आणि देखभाल योजना तयार केली आहे. पावसाळ्यापूर्वी धावपट्टीची दुरुस्ती करणे आवश्यक आहे जेणेकरून पावसळ्यात उड्डाणात कोणताही अडथळा येणार नाही. काही कंपन्यांनी उड्डाणे रद्द केली आहेत तर काही विमानांच्या उड्डाणाच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. धावपट्टीच्या बाजूला असलेल्या दिव्यांची दुरूस्ती, एरोनॉटिकल ग्राउंड दिव्यांमध्ये बदल यांसारखी प्रमुख कामे या कालावधीत केली जातील. या कामांमुळे प्रवाशांनी आरक्षित केलेल्या विमान सेवांबद्दल संबंधित विमान कंपन्यांकडून माहिती घ्यावी.

- Advertisement -

धावपट्टी बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई विमानतळाने विमान कंपन्या आणि विमान वाहतूक प्राधिकरणांसह धावपट्टी देखभालीच्या कामाचे नियोजन केले आहे. त्यामुळे विमान कंपन्यांना त्यांच्या वेळापत्रकानुसार नियोजन करण्यास मदत झाली आहे.


हेही वाचा – ‘श्रीमंत कसे व्हायचे…’, उद्धव ठाकरे यांनी चरित्र लिहिले पाहिजे; नितेश राणेंचा टोला

- Advertisment -