Eco friendly bappa Competition
घर क्राइम मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची धमकी; पोलीस यंत्रणा अलर्ट

मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची धमकी; पोलीस यंत्रणा अलर्ट

Subscribe

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. सोमवारी रात्री 10 वाजता एअरपोर्टवर हा धमकीचा फोन आला होता. इरफान अहमद शेख नावाच्या व्यक्तीने इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे नाव घेत ही धमकी दिली आहे. त्यानंतर मुंबई एअरपोर्ट परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबईच्या सहार पोलिसांनी कलम भादवी 505 (1) अन्वये अनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मुंबईच्या छत्रतपी शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवर सोमवारी 10 वाजल्याच्या सुमारास एक धमकीचा फोन आला होता. यावेळी धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपले नाव इरफान अहमद शेख असून तो इंडियन मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचे सांगितले. तसेच ओळख करुन दिल्यानंतरही तो व्यक्ती काही कोडवर्ड वापरत संशयास्पद बोलत राहिला, तसेच त्याने मुंबईवर हल्ला करण्याचाही इशारा दिला. यानंतर या अज्ञात फोनची माहिती विमानतळ प्रशासनाने तात्काळ मुंबई पोलिसांना दिली. दरम्यान विमानतळावरील सर्व एजन्सी आता अलर्ट मोडवर आहेत. पोलीस आणि सुरक्षा पथकाकडून विमानतळ परिसरात आणि एकूण मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याचे धमकीचे फोन येत आहेत. विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वी ‘एनआयए’लाही अशाचप्रकारे धमकी आली होती. त्यानंतर आता पुन्हा एक धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. ‘एनआयए’ला आलेल्या धमकीच्या कॉलनंतर मुंबईत अनेक ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यात मुंबईतील मंत्रालय, महत्त्वाची कार्यालये, स्टॉक एक्स्चेंज, हॉटेल ताज, सिद्धविनायक मंदिर, बाबूळनाथ मंदिर, मुंबादेवी मंदिर, उच्च न्यायालय, हाजीअली दर्गा, पंचतारांकित हॉटेल आणि मोठ्या कार्यक्रमांच्या आदी ठिकाणची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज विमानतळासह इतर ठिकाणची सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. येणाऱ्या- जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची, त्यांच्या सामानाची तपासणी केली जात आहे. तसेच एअरपोर्टवरील प्रत्येक व्यक्तीच्या हालचालींवरही सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेवून आहे.


अंबरनाथ, उल्हासनगरातील विकासकामे जलदगतीने मार्गी लागावीत- आमदार किणीकर

- Advertisement -
- Advertisement -
sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -