घरCORONA UPDATEMumbai corona Update: मुंबईत मंगळवारी १ हजार १२ नव्या रुग्णांची नोंद

Mumbai corona Update: मुंबईत मंगळवारी १ हजार १२ नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

२ कोरोनाबाधित रुग्णांचा आज मृ्त्यू झाला आहे.

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज मंगळवारी मुंबईत १ हजार १२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २ कोरोनाबाधित रुग्णांचा आज मृ्त्यू झाला आहे. मुंबईत आता पर्यंत ३३ लाख ५५ हजार ५५८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत आज १ हजार ५१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आता पर्यंत मुंबईत कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या ३१ लाख २४ हजार ४५८ इतकी झाली आहे. मुंबईत सध्या १० हजार ७३६ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत ११ हजार ५०६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

मुंबईचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा ९३ टक्के इतका आहे. २ मार्च ते ८ मार्च पर्यंत मुंबईत कोरोना वाढीचा दर हा ०.३२ टक्के इतका आहे. ८ मार्च पर्यंत मुंबईत एकूण ३४ लाख ५४ हजार १२९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मुंबईत २१ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर मुंबईत २१४ इमारती सील बंद आहेत.


हेही वाचा – दादर मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, गर्दी देतेय कोरोनाला निमंत्रण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -