घरमहाराष्ट्रजनतेची दिशाभूल करण्यासाठी वाझेंचा मुद्दा! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भाजपवर आरोप

जनतेची दिशाभूल करण्यासाठी वाझेंचा मुद्दा! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भाजपवर आरोप

Subscribe

केंद्र सरकारने केलेली अन्यायकारक इंधनदरवाढ, त्यामुळे वाढलेली महागाई, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, फडणवीस सरकारच्या काळातला महाऑनलाईन घोटाळा, मराठा आरक्षण प्रकरणातील केंद्र सरकारची संदिग्ध भूमिका, प्रभू श्रीरामाच्या नावाने सुरु असलेली लूट, अशा मुद्द्यांना बगल देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा भाजपचा प्रयत्न असून त्यासाठीच विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सचिन वाझेंचा मुद्दा उपस्थित करून गोंधळ घातला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी केला.

मनसुख हिरेन प्रकरणात जे दोषी असतील त्यांची चौकशी करून त्यांना शिक्षा करण्यात सरकार मागेपुढे पाहणार नाही, असेही पटोले म्हणाले. आज विधानसभेत मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावरून तसेच खासदार मोहन डोलकर यांच्या आयमहत्येवरून अभूतपूर्व गदारोळ झाला. या पार्श्वभूमीवर पटोले म्हणाले की, मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात सचिन वाझे हे चौकशी अधिकारी नाहीत. या प्रकरणाचा तपास एटीएसकडे आहे, त्याच्याशी वाझेंचा काहीही संबंध नाही. असे असतानाही विरोधी पक्ष जाणीवपूर्वक वाझेंचा मुद्दा उपस्थित करत आहेत. मुद्दामहून वाझेंचे नाव घेऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष नेत्यांकडून सुरु आहे.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांना कॉल डिटेल्स रेकॉर्ड कसे मिळाले? त्यांना ते मिळवण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न उपस्थित करून पटोले यांनी मुकेश अंबानी यांची अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था आहे. त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था असताना अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असलेली गाडी कशी काय जाऊ शकते? असा सवाल पटोले यांनी केला.


हेही वाचा- today gold rate: सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ, चांदीची चमक वाढतेयचं


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -