घरमुंबईमालमत्ता करापोटी १ हजार ७१४ कोटी थकीतच

मालमत्ता करापोटी १ हजार ७१४ कोटी थकीतच

Subscribe

एका दिवसात ४१६ कोटी रुपयांची वसुली, मालमत्ता कर वसुलीच्या शेवटच्या तरखेपर्यंत ३ हजार ४८६ कोटींची वसुली

कोरोनामुळे मुंबई महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. पालिकेला मालमत्ता कर वसुलीपोटी यंदा ५ हजार २०० कोटी रुपये जमा होणे अपेक्षित होते. ८ मार्च या शेवटच्या दिवशी ४१६ कोटी रुपये जमा झाले. आतापर्यंत मालमत्ता करापोटी पालिकेच्या तिजोरीत ३ हजार ४८६ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे अद्यापही करदात्यांकडे पालिकेचे मालमत्ता करापोटी १ हजार ७१४ कोटी थकीतच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता ही थकबाकी लवकरात लवकर वसूल करण्याचे आव्हान पालिकेसमोर उभे ठाकले आहे. मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे महत्वाचे स्रोत जकात कर हे होते. मात्र २०१७ पासून जकात कर वसुली बंद होऊन जीएसटी कर पद्धती लागू झाली. मुंबईला जकातीऐवजी आता जीएसटीचा दरमहा हप्ता मिळतो. आतापर्यंत राज्य सरकारकडून ३० हजार कोटी रुपये पालिकेला मिळाले आहेत. मात्र २०२२ नंतर हा जीएसटीचा हप्ता मिळणे पालिकेसाठी बंद होणार आहे. त्यामुळे आता पालिकेला मालमत्ता कर वसुलीवर जास्त भर द्यावा लागणार आहे.

यंदा पालिकेला मालमत्ता करापोटी ५ हजार २०० कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित होते. मात्र गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पालिकेच्या मालमत्ता कर वसुलीवर त्याचा परिणाम झाला. मालमत्ता करदात्यांनी ८ मार्च शेवटच्या तारखेपर्यंत मालमत्ता कर भरणे आवश्यक होते. मात्र कोरोना व लॉकडाऊनमुळे मोठमोठया कंपन्या बंद झाल्या. उद्योग, धंदे बंद झाले. कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. रोजगार बंद झाला. त्यामुळे मुंबईकर मेटाकुटीला आले. या कोरोनामुळे मालमत्ता करदात्यांना मालमत्ता कराचा भरणा करणेही अडचणीचे झाले. त्यामुळे मालमत्ता करापोटी वर्षभरात ३ हजार ४८६ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. अद्यापही १ हजार ७१४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. आता ८ मार्च या शेवटच्या दिवशी ४१६ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे आता ज्यांनी वेळेत मालमत्ता कर भरला नाही, कर थकवला त्यांना आता थकबाकीवर दंड म्हणून व्याज भरावे लागणार आहे.

- Advertisement -

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू हे मालमत्ता कर वसुलीच्या कार्यवाहीचा सातत्याने आढावा घेत असून, त्यांच्या मार्गदर्शनात याबाबत सूक्ष्मस्तरीय नियोजन व अंमलबजावणी नियमितपणे करण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या मालमत्ता कराचा भरणा तातडीने व वेळेत करावा; जेणेकरुन थकीत मालमत्ता कर रकमेवर दरमहा २ टक्के रकमेची दंडात्मक आकारणी; जल जोडणी खंडित करणे, चल संपत्ती जप्त करणे, अटकावणी करणे यासारखी विविध स्तरीय कारवाई टाळता येईल, असे आवाहन कर व संकलन खात्याचे सह आयुक्त सुनील धामणे आणि सहाय्यक आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी करदात्यांना केले आहे.


हेही वाचा- कोरोना काळात भूमाफियांकडून ९,५५८ अनधिकृत बांधकामे ; ४६६ वर कारवाई

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -