Mumbai Corona Update : मोठा दिलासा! मुंबईत आज 192 नवे रुग्ण, तर 2 रुग्णांचा मृत्यू

mumbai corona update 192 new corona cases reported in last 24 hours and 2 death mumbai
Mumbai Corona Update : मोठा दिलासा! मुंबईत आज 192 नवे रुग्ण, तर 2 रुग्णांचा मृत्यू

मुंबईकरांना कोरोना रुग्ण वाढीतून एक मोठा दिलासा मिळाला आहे. कारण मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या ही 200 वर येऊन पोहचली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 192 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांत 400 च्या जवळपास पोहचलेली रुग्णसंख्या आता 200 वर येऊन पोहचल्याने मुंबईतून कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याचे म्हटले जातेय. तसेच मुंबई कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसतेय. मुंबईत गेल्या 24 तासात 350 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेनंतर आता बरे होणाऱ्या रुग्णांचा दर 98 टक्क्यांवर पोहचला आहे.

मुंबईत आत्तापर्यंत 10,32186 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर 1,054,242 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आज झालेल्या 2 रुग्णांच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या ही 16 हजार 685 झाली आहे. मुंबईत आज नोंद झालेल्या 192 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 26 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर यातील 10 रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत.

मुंबईतील 7 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 2022 पर्यंतचा रुग्ण वाढीचा दर 0.04 टक्क्यांवर आला आहे. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा दर 1691 दिवसांवर आला आहे. मुंबईतील नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होण्याबरोबरचं जोखीम असलेल्या रुग्णांची संख्याही घटत आहे.

मुंबईत काही दिवसांपूर्वी रुग्णसंख्या वाढत होती त्यामुळे सक्रिय कंटेनमेट झोन आणि सीलबंद इमारतींची संख्याही वाढत होती, मात्र कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने आता मुंबईत एकही इमारत सीलबंद इमारत नाही तसेच सक्रिय कंटेनमेंट झोन नाही.


Vava Suresh : 250 वेळा सापानं दंश करूनही तो वाचला, ‘हे’ एक औषध ठरले रामबाण