घरताज्या घडामोडीGulabrao Patil : बाळासाहेबांनी अनेकांना मोठं केलंय, सायकल चोरही मुख्यमंत्री झाला, गुलाबरावांची...

Gulabrao Patil : बाळासाहेबांनी अनेकांना मोठं केलंय, सायकल चोरही मुख्यमंत्री झाला, गुलाबरावांची टीका

Subscribe

शिवसेनेकडे तुम्ही मागता मग संघटनेने तुम्हाला काय दिले हे सुद्धा बघितले पाहिजे. असे गुलाबराव पाटील म्हणाले.

शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी विरधकांवर टीकास्त्र डागलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकांना मोंठ केलं आहे. कोणी टपरिवाला, रिक्षावाला तर कोणी सायकल चोरणारा मुख्यमंत्री झाला असे वक्तव्य करत शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर निशाणा साधला आहे. शिवसंवाद मेळाव्यात संबोधित करताना गुलाबरावांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली आहे. यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या काही आठवणींनासुद्धा उजाळा दिला आहे.

मतलब के लिये कोई अपना बाप बदल लेता है असे वक्तव्य पणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. पाटलांनी नारायण राणेंवर खोचक शब्दात टीका केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नसते तर माझ्यासारखा माणूस आमदार काय तर सरपंचसुद्धा झाला नसता. परंतु जेव्हा २५ वर्षाचा होतो तेव्हा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख झालो होतो. मारपीट आपला धंदा होता आणि ९२ च्या दंगलीमध्ये आम्ही तिघेही भाऊ तुरुंगात होतो. त्यावेळी आमच्या पाठीशी शिवसेना उभी राहिली होती. मात्र आता शिवसेनेत काही नेते फक्त कार्डापुरती आहेत. शिवसेनेकडे तुम्ही मागता मग संघटनेने तुम्हाला काय दिले हे सुद्धा बघितले पाहिजे. असे गुलाबराव पाटील म्हणाले.

- Advertisement -

किरीट सोमय्यांचा समाचार

भाजप नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. शिवसेनेला लक्ष्य करण्यात येत आहे. भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी कोणाला प्रमाणपत्र देण्यात आले नाही. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांचा भ्रष्टाचार करण्यासाठी ईडीचा वापर करण्यात येत आहे. यामुळे राजकारणाची दिशा बदलली आहे. भाजपमध्ये सगळे लोकं मंडलेश्वर आहेत का? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला असून सोमय्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.


हेही वाचा : शिवसेना खासदार राजेंद्र गावितांना दणका, १ वर्षाचा तुरुंगवास अन् कोटींच्या दंडाची शिक्षा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -