Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Mumbai Corona Update: दिलासादायक! मुंबईच्या मृत्यूसंख्येत कमालीची घट, मंगळवारी केवळ ७ जणांचा...

Mumbai Corona Update: दिलासादायक! मुंबईच्या मृत्यूसंख्येत कमालीची घट, मंगळवारी केवळ ७ जणांचा मृत्यू

मुंबईत आज,मंगळवारी ६७३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Related Story

- Advertisement -

मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून मृत्यूसंख्येत चढ उतार पहायला मिळत होता. मात्र आज कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदा मुंबईच्या मृत्यूसंख्येत कमालीची घट झाल्याचे पहायला मिळाले आहे. (Mumbai corona death toll drops) मुंबईत आज,मंगळवारी केवळ ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Mumbai Corona Update: Mumbai Today Only 7 corona death in mumbai)  काल हिच संख्या २७ इतकी होती. मुंबईत आतापर्यंत नोंदवण्यात आलेली ही सर्वात कमी मृत्यूंची नोंद आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. मुंबईत आतापर्यंत झालेल्या मृत्यूंची संख्या ही १५ हजार ७३ इतकी आहे. हा आकडा शून्य नोंदवण्यात यावा अशी मुंबईकरांची देखील इच्छा आहे. मात्र त्यासाठी मुंबईकरांना कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कारण मुंबईत अद्याप १५ हजार ७०१ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईच्या अँक्टिव्ह रुग्णांमध्येही मागच्या काही दिवसात घट होताना पहायला मिळत आहे. (Mumbai Corona Update: Mumbai death toll drops, Today Only 7 corona death in mumbai)

- Advertisement -

मुंबईत आज नोंदवण्यात आलेल्या नव्या रुग्णांचा विचार केला असता मुंबईत आजही तीन अंकी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. मुंबईत आज,मंगळवारी एकूण २६ हजार ९९२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील ६७३ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे मुंबईत आज,मंगळवारी ६७३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील नव्याने नोंद करण्यात येणाऱ्या रुग्णांचा वेगही मागच्या दोन आठवड्यांपासून मंदावला आहे. मुंबईत आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या बाधित रुग्णांची संख्या ७ लाख १३ हजार २ इतकी आहे.

- Advertisement -

मुंबईत रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या कमी होत असली तरी मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांचा दर मंदावल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईत आज,मंगळवारी ७५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. काल हीच संख्या ९८० इतकी होती. मुंबईचा १ जून ते ७ जून पर्यंतचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा दर हा ०.१२ टक्के इतका झाला आहे. तर मुंबईचा रिकव्हरी रेट हा ९५ टक्क्यांवर आला आहे. मुंबईत सध्या २७ अँक्टिव्ह कंटेनमेंट झोन आहेत. तर ९८ अँक्टिव्ह सीलबंद इमारती. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्या कमी होत होती मात्र मृत्यूसंख्येत चढउतार पहायला मिळत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. मात्र आज जरी कमी मृत्यूंची नोंद करण्यात आली असली तरीही मुंबईचा धोका अद्याप कमी झाल्याचे म्हणता येत नाही त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे.


हेही वाचा –  Maharashtra corona update: गेल्या २४ तासात १०,८९१ नव्या बाधितांची नोंद, २९५ बळी

 

 

- Advertisement -