घरमुंबईमहिला डॉक्टरांनी केलं रॅगिंग; स्त्री-रोग तज्ज्ञाची आत्महत्या

महिला डॉक्टरांनी केलं रॅगिंग; स्त्री-रोग तज्ज्ञाची आत्महत्या

Subscribe

नायर रुग्णालयातील तीन वरिष्ठ महिला डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल

वरिष्ठ डॉक्टरांच्या रॅगींगला कंटाळून नायर हॉस्पिटलमधील स्त्री रोगतज्ञ महिला डॉक्टरने हॉस्पिटलमधेच असणाऱ्या हॉस्टेलच्या गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली आहे. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी नायर रुग्नालयातील स्त्रीरोग विभागातील ३ वरिष्ठ महिला डॉक्टर विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, जातीवाचक शब्द वापरणे तसेच रॅगिंग कायदा अंर्तगत गुन्हा दाखल कऱण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आगवणे यांनी दिली.

पायल तडवी (२५) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. पायल  मूळची जळगाव जिल्ह्यात राहणारी असून तिचा विवाह ३ वर्षांपूर्वी डॉक्टर सलमान तडवी यांच्यासोबत झाला. डॉक्टर तडवी हे कुपर हॉस्पिटलमध्ये प्राध्यापक आहे. सलमान हे भायखळा यांनी भाडेतत्वावर खोली घेऊन पत्नी पायल सोबत राहत होता. पायल स्त्रीरोगतज्ज्ञ असून तिने गेल्यावर्षीच तिने पुढील वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी नायर हॉस्पिटल येथे प्रवेश घेतला होता. डॉक्टर पायल हि नायर हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या हॉस्टेल मध्ये राहत होती.

- Advertisement -

मागील काही महिन्यापासून रुग्नालयातील वरिष्ठ महिला डॉक्टर तिचा मानसिक छळ करून तिला घालून पडून बोलत असे, त्यातच तिला शस्त्रक्रिया विभागात येऊन न देणे , जातीवाचक शब्द वापरणे, व्हाट्सअँप ग्रुपवर तिला एकटीला लक्ष करून तिला टोमणे मारणे या प्रकारचा त्रास देत असे. या प्रकरणी डॉक्टर पायल हिने आपल्या आईला सांगतले होते, तिच्या आईने प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार अर्ज केला होता. मात्र या अर्जानंतर या तिघी वरिष्ठ डॉक्टर तिला आणखीच त्रास देऊ लागल्यामुळे हा त्रास असह्य झाल्यामुळे अखेर डॉक्टर पायल हिने बुधवारी रात्री होस्टेलच्या खोलीतच गळफास लावून आत्महत्या केली.

- Advertisement -

या प्रकरणी आग्रीपाडा पोलीसानी तिच्या आईच्या तक्रारीवरून नायर रुग्नालयातील स्त्रीरोग विभागाच्या तीन वरिष्ठ महिला डॉक्टरविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, जातीवाचक शब्द वापरणे तसेच रॅगिंग कायदा अंर्तगत गुन्हा दाखल कऱण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आगवणे यांनी दिली. या प्रकरणी तपास सुरु असून अद्याप कोणालाही अटक कऱण्यात आली नसल्याचे आगवणे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -