घरमुंबईतर जंबो कोविड बंद होणार, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

तर जंबो कोविड बंद होणार, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

Subscribe

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे पालिका जंबो कोविड सेंटर बंद करण्याच्या तयारीत होती. मात्र ब्रिटनमधील कोरोनाने भारतात शिरकाव केल्याने मुंबई महापालिका प्रशासन जरा संभ्रमात असून जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या परिस्थितीचा सखोल आढावा घेतल्यानंतरच जंबो कोविड सेंटर बंद करायचे की त्यांची संख्या कमी करायची याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

याबाबत बोलताना अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर कोविड केंद्रा बंद करण्याबाबत निर्णय घेऊ. एकतर ते बंद करु किंवा त्यांची संख्या कमी केली जाऊ शकते. कारण, रुग्ण कमी झाले आहेत. नव्या स्ट्रेनमुळे सध्या हा निर्णय पुढे ढकलल्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

- Advertisement -

मुंबईत सध्या काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने काहीसे दिलसामय मूडमध्ये असलेल्या महापालिकेला यूके आणि मिडल इस्टमध्ये कोविड -१९ च्या नवीन स्ट्रेन समोर आल्याने आता टेन्शन आले आहे. सध्या कोरोनाशी संबंधित पालिकेचे सर्व निर्णय ‘वेट अँड वॉच’ च्या भूमिकेत आहेत. कारण, भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

कुठे आहेत जंबो कोविड सेंटर ?

सध्या, भायखळा, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, नेस्को मैदान (गोरेगाव पूर्व), मुलुंड आणि दहिसर येथे सध्या पाच जंबो कोविड केअर केंद्रे आहेत. महालक्ष्मी कोविड केअर केंद्रातील सामान्य वॉर्ड बंद करण्यात आला असून आयसीयू आणि व्हेंटिलेटरची सुविधा सुरू आहे. त्यामुळे जानेवारी २०२१ मध्ये जंबो कोविड केअर सेंटर बंद करण्याबाबत पालिका आढावा बैठक घेणार असून त्यामध्ये पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -