घरमुंबईमेट्रोच्या डब्यांसाठी सात कंपन्यांमध्ये स्पर्धा

मेट्रोच्या डब्यांसाठी सात कंपन्यांमध्ये स्पर्धा

Subscribe

मुंबई मेट्रोसाठी डब्बे पुरवण्यासाठी सात कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. मुंबई मेट्रोसाठी एकूण ३७८ डब्बे लागणार आहे.

मुंबईच्या मेट्रोसाठी लागणारे डब्बे आम्हीच देणार यासाठी सध्या कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. दहिसर ते डी एन नगर मेट्रो मार्ग २ अ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर (पूर्व) मेट्रो मार्ग ७ या प्रकल्पांसाठी डबे पुरवण्यासाठी सात कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. ३७८ डब्ब्यांची पुर्तता करण्यासाठी ही स्पर्धा सुरू आहे. भारतीय तसेच परदेशी कंपन्यांनी या निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. एशियन डेव्हलपमेंट बॅँकेच्या निकषानुसार ही निविदा प्रक्रिया पार पडली आहे. ह्युंदई रॉटेम (कोरिया), बॉंबार्डियर इंडिया अण्ड बॉंबार्डियर जर्मनी, सी. आर. आर. सी. कॉर्पोरेशन, भारत अर्थ मूव्हर्स, टायगर वॅगन्स अण्ड टायटॅगर फिरेमा, अल्स्टॉम ट्रान्सपोर्ट इंडिया अण्ड एल्स्टॉम एस. ए आणि सी. ए. एफ. इंडिया एण्ड सी.ए. एफ स्पेन अशी निविदा प्रक्रियेत सहभागी कंपन्यांची नावे आहेत.

निविदा प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद

निविदा प्रक्रियेसाठी आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून दोन्ही मार्गांचं काम नियोजित वेळेत पुर्ण होईल. असा विश्वास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी व्यक्त केला आहे. सुरक्षित, पर्यावरणस्नेही आणि जागतिक गुणवत्तेचे मेट्रो मार्गांचे जाळे मुंबईत निर्माण करण्याचे आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. निविदा प्रक्रियेत यशस्वी कंपनीला ६३ सुपरफास्ट असे मेट्रोचे डबे पुरवण्याची जबाबदारी आहे. शिवाय, जागतिक पातळीवर मानांकन असणाऱ्या गुणवत्तेचे डबे असणे गरजेचे आहे. वरिष्ठ नागरिक, महिला आणि विशेष व्यक्तींना आरामशीर प्रवास करता यावा यादृष्टीने मेट्रोमध्ये खास सुविधा असणार आहेत. मेट्रोचे सर्व डब्बे वातानुकुलित, पर्यावरणस्नेही, सीसीटीव्ही सुविधायुक्त असतील. या डब्यांना अत्याधुनिक अशी ब्रेकिंग सिस्टिमही असेल. सुरक्षिततेच्या सर्व सुविधांनी युक्त असेल असे हे डब्बे परिपुर्ण असतील. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या मेट्रोसाठी सीबीटीसी ही विशेष सिग्नलिंग तंत्रज्ञान प्रणाली वापरण्यात येणार आहे. शिवाय, प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअरची सुविधाही या मेट्रोच्या डब्यांमध्ये असेल. या निविदा प्रक्रियेसाठी मूल्यांकन समिती हे सर्व निकष आणि सेवा पुरवणाऱ्या कंपनीची निवड करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -