घरमुंबईमुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी प्रभाग रचनेच्या ८९३ पैकी ३३८ हरकती व सूचनांकडे अर्जदारांचीचं...

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी प्रभाग रचनेच्या ८९३ पैकी ३३८ हरकती व सूचनांकडे अर्जदारांचीचं पाठ

Subscribe

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवरील ८९३ हरकती, सूचना पालिकेकडे दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर मंगळवारपासून सुनावणी सुरु झाली होती. या ८९३ पैकी ५५५ हरकती, सूचनांवर सुनावणी पूर्ण करण्यात आली. मात्र उर्वरित ३३८ अर्जदारांनी सुनावणीला दांडी मारत चक्क पाठ फिरवली.

त्यामुळे आता सुनावणीनंतर त्याबाबतचा अहवाल पालिका प्रशासन राज्य निवडणूक आयोगाला सादर करणार आहे. त्यावर निवडणूक आयोग आपला अंतिम निर्णय घेऊन तो जाहीर करेल.वास्तविक, पालिकेकडे एकूण ८९३ हरकती व सूचना आल्या होत्या. पहिल्याच दिवशी पश्चिम उपनगरातील ३९० हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यात येणार होती ; मात्र त्यापैकी ९० अर्जदार गैरहजर राहिल्याने प्रत्यक्षात ३०० हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यात आली होती.

- Advertisement -

त्यानंतर पुन्हा २५५ हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यात आली. त्यामुळे एकूण ८९३ पैकी ५५५ हरकती व सूचनांवर सुनावणी पूर्ण झाली आहे. तर ३३८ अर्जदारांनी सुनावणीकडे पाठ फिरवली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर आक्षेप घेऊन मुंबई शहर व दोन्ही उपनगरातून १४ फेब्रुवारीपर्यंत तब्बल ८९३ हरकती व सूचना पालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. या हरकती सूचनांवर २२ व २३ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेतली असता ८९३ अर्जदारांपैकी ५५५ अर्जदार उपस्थित होते. तर ३३८ अर्जदार गैरहजर असल्याचे पालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले.

- Advertisement -

सदर हरकती व सूचना यांबाबतची सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता त्याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर करणार असून २ मार्चला निवडणूक आयोग अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.


‘आता मी सेलिब्रिटी झालोय, शेंगदाणे विकत नाही; 3 लाखांचा चेक मिळताच ‘कच्चा बदाम’ सिंगरचे सूर बदलले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -