घरट्रेंडिंग'आता मी सेलिब्रिटी झालोय, शेंगदाणे विकत नाही; 3 लाखांचा चेक मिळताच 'कच्चा...

‘आता मी सेलिब्रिटी झालोय, शेंगदाणे विकत नाही; 3 लाखांचा चेक मिळताच ‘कच्चा बदाम’ सिंगरचे सूर बदलले

Subscribe

‘कच्चा बदाम’ गाण्यामुळे रातोरात ‘सुपर सिंगर’ ठरलेला भुबन बदयाकर यांच्या आयुष्यात पुन्हा चांगले दिवस येऊ लागले आहेत. शेंगदाणे विकणारे भुबन बदयाकर यांच कच्चा बदाम हे गाणे इतकं लोकप्रिय झालं की, इन्स्टाग्राम रिल्सवर प्रत्येक एक दोन व्हिडीओनंतर याच गाण्याच्या रिल्स दिसू लागल्या. अशातच एका म्युझिक कंपनीने आता भुबन बदयाकर यांना तीन लाखांचा चेक दिला आहे आणि त्याच्यासोबत एका नवीन करारही केला आहे. भुबन यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्यांना अनेक शोमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. दरम्यान, आता सेलिब्रिटी झाल्यामुळे शेंगदाणे विकणे बंद केल्याचे भुबन यांनी म्हटले आहे.

रस्त्यावर फिरून शेंगदाणे विकण्यापासून ते नाईट क्लबमध्ये गाणी गाण्यापर्यंत, गेल्या काही दिवसांत भुबनच्या आयुष्याला नवे वळण लागले आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, मी आता सेलिब्रिटी झालो आहे. त्यामुळे सेलिब्रिटी म्हणून मला शेंगदाणे विकावे लागले तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तुम्ही मला खूप प्रेम दिले आहे, त्यामुळे मी तुमचा खूप आभारी आहे. मला कलाकार राहायचे आहे. माझ्या शेजाऱ्यांनी सांगितले आहे की, मी जास्त बाहेर जाऊ नये कारण कोणीही माझे अपहरण करू शकते.

- Advertisement -

‘कच्चा बदाम’ हे गाणं हिट झाल्यानंतर भुबन एक सेलिब्रिटी बनले आहेत. अनेक लोक त्यांच्यासोबत व्हिडीओ तयार करत आहेत तर अनेक जण फोटो काढू लागले आहेत, एवढेच नाही तर त्यांचा बंगाल पोलिसांकडूनही सन्मान करण्यात आला आहे.

पश्चिम बंगालमध्ये शेंगदाणा विकणारे भुबन बदयाकर यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘कच्चा बदाम’ हे गाणे तयार केले होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दररोज ३-४ किलो शेंगदाणे विकून ते 200 ते 250 रुपये कमावायचे. ‘कच्चा बदम’ नंतर भुबन बदयाकर इंटरनेट सेन्सेशन बनले आहेत. अनेक स्टार्सनींही कच्च्या बदाम गाण्यावर व्हिडिओ बनवले आहेत.


Hijab Row Controversy : शीख समुदायापर्यंत पोहोचले हिजाब प्रकरणाचे लोण; पगडी घातलेल्या विद्यार्थ्याला बंगळुरूच्या कॉलेजमध्ये प्रवेश नाकारला

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -