Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई पोलीस बळ कमी असल्याने जनतेने सहकार्य करावे- पोलीस आयुक्त हेमंत नगराळे

पोलीस बळ कमी असल्याने जनतेने सहकार्य करावे- पोलीस आयुक्त हेमंत नगराळे

Related Story

- Advertisement -

राज्यासह मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यातच मुंबईत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबई पालिका आणि मुंबई पोलीसांनी कंबर कसली आहे. यातच राज्यात कोरोना निर्बंध आता अधिक कडक करण्यात आले आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पोलीस बळ कमी असल्याने जनतेने सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. एबीपी माझा वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी हे आवाहन केले आहे.

यावेळी बोलताना मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले की, आपल्याकडे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अंमलबजावणी संस्थ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे सामान्य नागरिक या लॉकडाऊनच्या आदेशाचे स्वत:हून पालन करणार नाहीत तसेच आपल्या कुटुंबियांना सांगणार नाहीत तोपर्यंत हा लॉकडाऊन परिणामकारक ठरणार नाही. आरोग्य सेवा मर्यादित आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वर्ग हा देखील मर्यादित आहे. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग ज्या दुपटीने पसरतोय ही खूप गंभीर समस्या आहे. जर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण यावर अंकुश ठेवला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. यासाठीच शासनाने हा लॉकडाऊन नागरिकांवर लादला आहे. या लॉकडाऊनचे पालन करण्याची सर्वस्वी जबाबदारी नागरिकांची आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनदरम्यान पोलीस आणि सामान्य जनतेमधील संबंधांबाबत बोलताना मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणाले की, लोकांचा साधारण कल असा असतो की, लॉकडाऊन असेल तरीही दुकाने उघडणे, रस्त्यावर येणे तसेच सामान्य कामे करण्याकडे कल असतो. यापरिस्थिती पोलिसांबरोबर वाद, पोलिसांची टिंगल उडवणे किंवा पोलिसांसमोर मुद्दाम मास्क न लावता फिरणे यावेळी पोलिसांनी फटकारले तर पोलिसांसोबत हुंजत घालणे असे प्रकार घडतात. यावर माझी जनतेला विनंती, आवाहन आहे. की आपल्याकडे पोलिस बळ फार कमी प्रमाणात आहे. त्यामुळे कायदा न पाळणारे नागरिक जर रस्त्यावर आले तर आपण हतबल होऊन पोलिसांकडे कडक कारवाईशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. असेही ते म्हणाले.

लॉकडाऊनदरम्यानही मुंबईच्या फुटपाथ बसणाऱ्या फेरीवाल्याबाबत बोलताना आयुक्त म्हणाले की, मार्केट, बाजार परिसरात गर्दी रोखण्यासाठी मुंबई पोलिसांच्या रोड पेट्रोलिंगच्या गाड्य़ांसह बिट मार्शल फिरत असतात. लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व व्यवस्था बंद असल्याने पोलिसांची तपास यंत्रणाही काही प्रमाणात थंडावते. कारण यावेळी कोणतेही पुरावे अथवा साक्षीदार आपण बोलवू शकत नाही. त्यामुळे मुंबई पोलीसांचे मनुष्यबळ लॉकडाऊनच्या काळात मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वापरण्यात येईल. समाजघातकी कृत्य करणाऱ्यांसाठी पोलिस बळ असते. सामान्यता जास्तीत जास्त लोक कायदाप्रिय असल्याचे समजून आपण पोलिस दलाची रचना करत असतो. तेवढा फौजफाटा ठेवत असतो. मुंबईत साधारण ९०० लोकांमागे १ पोलीस काँस्टेबल असे गणित आहे. मात्र या ९०० जणांमधील ५० ते ९० लोकं गुंड असतील तर त्याच्यासाठी आपले पोलीस बळ पुरेसे असते. परंतु यातील २००- ३०० लोक कायद्याविरोधात काम करत असतील आपले पोलीस बळ अपुरे पडणार आहे. अशीही माहिती त्यांनी एबीपी माझ्याच्या मुलाखतीत दिली.

- Advertisement -

औषधांचा होणारा काळाबाजार रोखण्यावर आयुक्त म्हणाले की, अत्यावश्यक औषधांचा काळाबाजार, अनैतिक पद्धतीने जास्त किंमतीला विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास गुन्हा नोंदवून योग्य ती कारवाई करणार आहे. कोरोना नियम मोडणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याबाबत बोलताना नगराळे म्हणाले की, मुंबई पालिकेने कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही दिले आहेत. यामुळे मुंबईत नियम मोडणाऱ्यांविरोधात दिवसात ६ ते ७ हजार केस समोर येत असून पालिकेने दिलेला दंड ठोठावला जात आहे.तसेच कायदा मोडणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल असाही इशारा पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिला आहे.


 

 

- Advertisement -