घरमुंबईCorona: धारावीत ८१ हजार सर्जिकल मास्क जप्त; पोलिसांची धडक कारवाई

Corona: धारावीत ८१ हजार सर्जिकल मास्क जप्त; पोलिसांची धडक कारवाई

Subscribe

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा विभागाकडून सर्जिकल मास्कचा साठा जप्त

मुंबईतील धारावी परिसरात बुधवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा विभागाकडून सर्जिकल मास्कचा साठा जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धारावीतील एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याने ८१ हजारांचे सर्जिकल मास्कची अवैधरित्या साठवणूक केली होते. या सर्जिकल मास्कसह त्या व्यक्तीकडून १२ लाख १५ हजारांची इतर सामग्री देखील जप्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

लॉकडाऊन दरम्यान अनेक व्यापाऱ्यांकडून जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार होत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहे. कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात अशाच गैरमार्गाने वागणाऱ्या साठेबाजी करणाऱ्या लोकांमुळे राज्यभरात मास्कसह सॅनिटायझरची कमतरता निर्माण झाली होती. अशा गंभीर परिस्थितीत अत्यावश्यक वस्तूंची साठेबाजी करणाऱ्यांवर पोलिसांकडून धडक कारवाई सुरु करण्यात आली होती.

गेल्या काही दिवसांपुर्वी मुंबई पोलिसांनी एक ट्रक अडवला होता. त्यात साधारण १४ कोटी रुपये किमतीचे २५ लाख मास्क जप्त करण्यात आले होते. मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १९३६ इतकी असून त्यापैकी ११३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १८१ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. धारावी आणि इतर भागातील झोपडपट्टीच्या परिसरात वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण मुंबई महानगरपालिकेच्यादृष्टीने चिंतेची बाब बनली आहे.


भारतातल्या ४०० जिल्ह्यांमध्ये कोरोना पोहोचू शकलेला नाही!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -