CoronaVirus: कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना झोप येईना!

medical staff also fear due to corona virus one third doctors are not sleeping
CoronaVirus: कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना झोप येईना!

संपूर्ण जग कोरोना व्हायरस संकटाशी लढत आहे. चीनमधील वुहान शहरात कोरोना व्हायरस उद्यास आला. त्यानंतर हा व्हायरस संपूर्ण जगात पसरला. चीनमधील कोरोना रुग्णावर उपचार करून डॉक्टर इतके भयभीत झाले की, त्यांना रात्रीची झोपचं येत नाही आहे. कोरोना व्हायरस तिथल्या डॉक्टरांसाठी मानसिक आजार झाला आहे. एका संशोधनानुसार, चीनमधील डॉक्टरांना झोपेची समस्या येऊ लागली आहे. तसंच कोरोना रुग्णावर उपचार करणाऱ्या मेडिकल स्टाफना देखील इंसोमनिया नावाचा आजार होत आहे. या आजारामुळे त्यांना झोप येत नाही आहे.

जे डॉक्टर आणि मेडिकल स्टाफ कोरोना रुग्णांचा जास्त जवळ जातात त्यांनाच ही समस्या जाणवत आहे. त्याच्या मनात भीती असते की, त्यांना देखील कोरोनाची लागण होईल. चीनच्या वैद्यकीय विद्यापीठाच्या प्राध्यापक बिन झांग यांनी हे संशोधन केलं आहे. या संशोधनात १ हजार ५६३ लोकांना समाविष्ट करण्यात आले आहे. हे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत. लेखक बिना झांग म्हणाले की, हा आजार काही दिवसांत निघून जाईल. पण कोरोनाच प्रमाणात वाढत गेलं तर हा आजार कायमस्वरुपी राहिल.

चीन परिस्थितीती पूर्वपदावर आली असली तरी आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ८२ हजार २९५वर आहे. त्यापैकी ३ हजार ३४२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७४ हजार ८६२ कोरोनाचे रुग्ण रिकव्हर झाले आहेत.


हेही वाचा – ‘या’ अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन, व्हिडीओ कॉलद्वारे घेतलं शेवटचं दर्शन