घरमुंबईस्कॉर्पिओ मालक मनसुख हिरेनची आत्महत्याच, पोलीसांची मोठी माहिती

स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरेनची आत्महत्याच, पोलीसांची मोठी माहिती

Subscribe

मनसुख हिरेन बेपत्ता असल्याची कुटुंबीयांची तक्रार

देशातील प्रख्यात उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर अवैध स्फोटकांसह एक गाडी सापडली होती. या गाडीचे मालक मनसुख हीरेन यांचा मृतदेह ठाण्यातील मुंब्रा रेती बंदर येथील खाडीत सापडला आहे. गाडी मालकाचाच संशयास्पृद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने अंबानीच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केली की हत्या करण्यात आली अशा चर्चांणा उधाण आले आहे. परंतु पोलीसांनी मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासामध्ये असे कळाले आहे की, मनसुख हिरेन यांनी खाडीत उडी घेत आत्महत्या केली आहे. मनसुख हे ठाण्यातील रहिवासी होते. त्यांनी ठाण्यातील मुंब्रा रेती बंदर खाडीत उडी घेतली. त्यांचा मृतदेह याच खाडीतून काढण्यात आला. तसेच मनसुख हिरेन बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटूंबीयांनी नौपाडा पोलीस स्थानकात केली होती.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एक गाडी सापडली. हा घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे. वाहन सापडल्यावर टेलीग्रामवर एक ग्रुप तयार झाला आणि त्यावर एक पत्र आले, ‘जैश उल हिंद‘ नावाने. एक क्रिप्टो करंसी अकाऊंट दिलं होतं. पण तसं कुठलं खातंच नव्हतं. या ठिकाणी एक नाही तर दोन गाड्या. गाडी ओळखल्याबरोबर सचिन वाझे पहिल्यांदा पोहोचले. तीन दिवसांपूर्वी सचिन वाझे यांना काढले. ज्यांची गाडी चोरीला गेली, त्याच्याशी एका क्रमांकावर अनेक वेळा संवाद झाले. वाझे ठाण्यातील, गाड्या ठाण्यातील आणि या दोघांचे आधीपासून संवाद होता. शंकेला वाव देणारे बरेच पुरावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी NIA ला द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली.

- Advertisement -

हेही वाचा : अंबानी स्फोटक प्रकरण: स्कॉर्पिओ मालकाचा संशयास्पद मृत्यू; सचिन वाझे यांची पहिली प्रतिक्रिया


जैश उल हिंद या अतिरेकी संघटनेने या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी झटकल्याने एकूणच संशय बळावला होता. आता तर स्कॉर्पियोचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह मुंब्रा रेती बंगदर येथे सापडल्याने हे सरर्व प्रकरण आता गंभीर वळणावर पोहचले आहे. गेल्याच आठवड्यात हिरेन यांनी स्वतः पोलिसांसमोर हजर राहत आपली गाडी हरवली असल्याची तक्रार पोलीस स्थानकात केली होती. दरम्यान शुक्रवारी दुपारी हीरेन यांच्या कुटूंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार नौपाडा पोलीस स्थानकात नोंदवली होती. मात्र काही तासांअगोदरच मनसुख हिरेन याचा मृतदेह रेती बंदर येथील खाडीत सापडला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे.


हेही वाचा : स्कॉर्पियोच्या मालकाचा मृतदेह सापडला मुंब्रा रेती बंदरच्या खाडीत


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -