घरCORONA UPDATEMumbai corona update: चिंता वाढली! गेल्या २४ तासात ८६३ कोरोनाबाधित तर २३...

Mumbai corona update: चिंता वाढली! गेल्या २४ तासात ८६३ कोरोनाबाधित तर २३ जणांचा मृत्यू

Subscribe

कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याचा दर ९५ टक्क्यावर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं मुंबईसह राज्यभरात कहर केला आहे. दरम्यान राज्य सरकार आणि मुंबई पालिका प्रशासनानं उपाययोजना करुन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता डेल्टा प्लसच्या व्हेरिएंट्समुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र मुंबईत कोरोना बाधितांसह कोरोनाने बळी जाणाऱ्यांचा आकड्यात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पु्न्हा एकदा मुंबईची चिंता वाढली आहे. मंगळवारी मुंबईत गेल्या २४ तासात ५७० जणांना कोरोनाची बाधा झाली तर १० जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज बुधवारी कोरोना रूग्णांमध्ये वाढ झाली असून गेल्या २४ तासात ८६३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला तर २३ जणांना आपला प्राण कोरोनामुळे गमवावा लागला आहे.

मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख २३ हजार ३२१ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून यामध्ये मागील २४ तासात ८६३ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत ६ लाख ९१ हजार १२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये आज ७११ कोरोना रुग्णांनी मात केली आहे. मुंबई पालिका क्षेत्रात १४ हजार ५७७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत आतापर्यंत १५ हजार ३३८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून यामध्ये मगाील २४ तासात २३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबईत मागील २४ तासात ३७ हजार ९०७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत ६९ लाख ११ हजार ५२६ चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याचा दर ९५ टक्क्यावर गेला आहे. तर कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर ७२८ दिवसांवर गेला आहे. मुंबईत १२ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर सक्रीय ८८ सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासात मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १७ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. १२ रुग्ण पुरुष व ११ रुग्ण महिला होते.२ रूग्णांचे वय ४० वर्षांखाली तर १२ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. उर्वरित ९ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते.


अमिताभ बच्चन यांच्याकडून शीव रुग्णालयास ‘व्हेंटिलेटर’ची देणगी; आत्तापर्यंत ३० रुग्णांवर झाले प्रभावी

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -