घरमुंबईआता 'बेस्ट' बसेसचा भार 'एसटी' महामंडळ उचलणार

आता ‘बेस्ट’ बसेसचा भार ‘एसटी’ महामंडळ उचलणार

Subscribe

एसटी बसेसची मुंबई उपनगर संख्या वाढविणार

बेस्टने मुंबई शहरांतर्गत बेस्ट बसने आणि मुंबई महानगरात एसटीने सोमवारपासून नियमित सेवा देण्यास सुरुवात केली आली आहे. मात्र बेस्ट बसेसची संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांची गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने एसटी महामंडळाला जादा बस सोडण्याची विनंती केली आहे. आता एसटी महामंडळ टप्याटप्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त जादा बस सोडणार आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, मंत्रालय, अन्य शासकीय कार्यालयांमध्ये १५ टक्के उपस्थिती केली आहे. तर, खासगी कार्यालयांना १० टक्के कर्मचार्‍यांसह काम करण्याची परवानगी देखील देण्यात आली. त्यामुळे सोमवारपासून बेस्टने २  हजार १०० बसेस आणि एसटीने अतिरिक्त २५० बसचे नियोजन केले होते. मात्र या सगळ्या नियोजनावर पहिल्याच दिवशी पाणी फिरल्याचं चित्र मुंबई आणि उपनगरांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये दिसून आले आहे. इतके नव्हे तर मंगळवारी आणि बुधवारी अशीच परिस्थिती होती.

- Advertisement -

एसटी महामंडळाला जादा बस सोडण्याची विनंती

त्यामुळे बेस्ट प्रशासनाने एसटी महामंडळाला जादा बस सोडण्याची विनंती केली. त्यानुसार आता बेस्टवरील प्रवाशांचा जादा भार कमी करण्यासाठी एसटी अतिरिक्त फेऱ्या चालविणार आहे. एसटी बसच्या फेऱ्या टप्याटप्याने वाढविल्या जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बेस्टवर येणारा प्रवाशांचा भार कमी होणार

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, शासकीय कर्मचारी, मुंबई महापालिकेचे कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस, अग्निशामक दलाचे कर्मचारी या सर्वांना ने-आण करण्यासाठी एसटीच्या तब्बल ४०० बसद्वारे दररोज ८०० पेक्षा जास्त फेऱ्या केल्या जातात. दररोज सुमारे १४-१५ हजार अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षित ने-आण एसटीच्या बसद्वारे केली जात आहे. तर, ८ जूनपासून अतिरिक्त २५० एसटी बस चालविल्या जात आहेत. यात आणखी बसेसची भर पडणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात बेस्टचा बसेसवर येणारा प्रवाशांचा भार कमी होणार आहे.


काँग्रेस सरकारमध्ये समाधानी नाही? बाळासाहेब थोरातांनी बोलून दाखवली खदखद!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -