Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Video : मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरूच, हायटाईडची शक्यता!

Video : मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरूच, हायटाईडची शक्यता!

Related Story

- Advertisement -

मुंबईमध्ये गेले दोन दिवस सुरु असलेल्या पावसाने रविवारी सकाळपासून आणखीनच जोर धरला आहे.  शनिवार- रविवार मुंबईमध्ये हायअलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबईसह नवी मुंबई रायगड, पालघर, ठाणे या विभागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काल रात्री मुंबईला मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर आज देखील अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आज मुंबईत साडेबाराच्या सुमारास भरतीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणूनच महापालिकेने २४ विभागांना दक्षतेचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

ठाणे-दिवा-डोंबिवली-कल्याण-भिवंडी परिसरात रात्रभर पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. मागील दोन दिवस मुंबईला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. काल रात्री ८.३० ला तब्बल १३२ मिमी पावसाची नोंद हवामान खात्याने केली आहे.  उत्तर कोकणात रेड अलर्ट, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात येत्या २४तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील काही भागांमध्ये रिमझिम पाऊस पडेल मराठवाड्यात आज पाऊस दडी मारणार असल्याचंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

मुंबईमध्ये आज तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळतो आहे. यामुळे मुंबई मधील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. चेंबूरच्या पोस्टल कॉलनी विभागात रात्रभर झालेल्या पावसाने गुडघाभर पाणी साचले आहे. यावर्षीचा मोसमातील सर्वाधिक पाऊस आजच्या दिवशी झाल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे दिवस भरातील मुसळधार पावसाने ठाण्यात १२ ठिकाणी पाणी साचले आणि तीन ठिकाणी झाडे कोसळण्याच्या दुर्घटना झाल्या.


हे ही वाचा – पुलवामात आयईडी बॉम्ब हल्ला, एक जवान जखमी


 

- Advertisement -