घरमुंबईमुंबई विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दिलासा; ठरलेल्या वेळेनुसार होणार परीक्षा

मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दिलासा; ठरलेल्या वेळेनुसार होणार परीक्षा

Subscribe

मुंबई विद्यापीठाच्या स्थगित करण्यात आलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा याआधी जाहीर करण्यात आलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसारचं घेण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे 6 फेब्रुवारीला वेळेनुसार विद्यार्थ्यांना आपली परीक्षा द्यावी लागणार आहे.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्या मंजूर करून घेण्यासाठी बेमुदत संप पुकारला. परिणामी 50 हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. परंतु आता या सर्व विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाकडून दिलासा देण्यात आला आहे. मुंबई विद्यापाठीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबई विद्यापीठाने दिलेल्या याआधी दिलेल्या वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. तर 3 आणि 4 फेब्रुवारीला स्थगित झालेल्या परीक्षांचे वेळापत्रक हे मुंबई विद्यापीठाच्या http://mu.ac.in या संकेतस्थळावर लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांनी रिक्त असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांवर लवकरात लवकर भरती करण्यात यावी, तसेच इतर प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी परीक्षांपासून इतर सर्वच इतर कामांवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या एलएलबी, एलएलएम, एमए, एमएससी, एमकॉम आणि इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला होता.

- Advertisement -

दरम्यान, आता मुंबई विद्यापीठाकडून तब्बल 50 हजार विद्यार्थ्यांना दिलासा देत सोमवार, 6 फेब्रुवारीपासून याआधी ठरलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता वेळापत्रकात दिलेल्या वेळेनुसार विद्यार्थ्यांना परीक्षेला हजर राहावे लागणार आहे. तर, मुंबई विद्यापीठाच्या निर्णयामुळे 3 आणि 4 फेब्रुवारीला होणारे पेपर स्थगित झाले. त्यामुळे या दोन दिवसांचे सुधारित वेळापत्रक लवकरच मुंबई विद्यापीठाच्या संकेत स्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

हेही वाचा – मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यासाठी टास्क फोर्स स्थापणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

- Advertisement -

शिवाजी विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि जळगाव विद्यापीठ झालेल्या आंदोलनांचे नेतृत्व बिगर कृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या सदस्यांनी केले आहे. शुक्रवारी (ता. 3 फेब्रुवारी) महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मुंबई विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (एसयूके) यांना त्यांच्या परीक्षा आयोजित करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्याचे निर्देश दिले आहेत. या विद्यापीठांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनिश्चित काळासाठी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

हेही वाचा – कसबा-चिंचवडच्या पोटनिवडणुका बिनविरोध करा, राज ठाकरेंचे मविआला पत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -