घरक्राइमनाशिकच्या महाविद्यालयीन तरुणी पुन्हा भिडल्या

नाशिकच्या महाविद्यालयीन तरुणी पुन्हा भिडल्या

Subscribe

एकमेकींचे केस-कपडे ओढत फ्री-स्टाईल

नाशिक । महाविद्यालयीन जीवनात मित्र-मैत्रिणींसोबतचे वाद नवीन नाहीत. त्यातून लुटुपुटूची लढाईदेखील होते. मात्र, नाशिकरोड भागातील बिटको कॉलेजसमोर मुलींमध्ये झालेल्या फ्री-स्टाईलने तर कळस गाठला. ही हाणामारी एवढी जोरदार होती की मुलींनी एकमेकींचे केस आणि कपडे ओढले.

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. महाविद्यालयीन गणवेश परिधान केलेल्या या मुली भररस्त्यात फ्री स्टाईल हाणामारी करताना दिसत आहेत. नेटकरीदेखील या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत आहेत. नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थिनींमध्ये सकाळच्या सुमारास ही फ्री स्टाईल हाणामारी झाली. ही घटना उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याने दिवसभर या फ्री स्टाईलची चर्चा रंगली होती.

- Advertisement -

ही हाणामारी सोडविण्याचा प्रयत्न एका महिलेने केला. भांडण सुरू असतानाच या मुली एकमेकींशी हाणामारी करतात. आजूबाजूला व्हायरल व्हिडीओत विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येत असून, यावेळी बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती. सदरचा प्रकार महाविद्यालयीच्या बाहेरील पार्किंगमध्ये झाल्याचे दिसून येते.

नेटकरीही गोंधळले

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत मुलींना अशाप्रकारे हाणामारी करताना पाहून अनेक लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र, या मुलींच्या गटामध्ये मारामारी का झाली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या व्हीडीओवर लोक वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडीओवर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -