Sunday, July 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई मुंबईकरांवर ओढवणार पाणी कपातीचे संकट

मुंबईकरांवर ओढवणार पाणी कपातीचे संकट

Related Story

- Advertisement -

मुंबईत पावसाने दडी मारल्याने तलावांमधील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत तलावांतील पाणी साठा न वाढल्यास मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवणार आहे. पाणी साठा वाढण्यासंदर्भात मुंबई महानगपालिका आणखी ७ दिवसांची वाढ पाहणार नाही. मात्र यादरम्यान तलावांमध्ये मुबलक पाणी साठा उपलब्ध न झाल्यास मुंबईकरांना दररोज पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये पाण्याची पातळी अधिक खालवली आहे. यात सर्वात कमी क्षमता असलोल्या तुळशी तलावाला वगळण्यात आले आहे. सध्या या सात तलावांमध्ये जवळपास २ लाख ५१ हजार ११९ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे येत्या सात दिवसांची प्रतिक्षा करत पालिका आता मुंबईत पाणी कपातीचा निर्णय घेणार आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षी या कालावधीत मुंबईतील सात तलावांमध्ये ३ लाख ४७ हजार १२३ दशलक्ष लीटर पाणीसाठी उपलब्ध होता. तर यापूर्वी २०२१९ मध्ये जवळपास दुप्पट म्हणजे ६ लाख ७९ हजार ९३२ दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध होता. त्यामुळे पाणी साठ्याची ही टक्केवारी २०२० मध्ये २३.९८ टक्के आणि २०१९ मध्ये ४६. ९८ टक्के होती. मात्र आता ही टक्केवारी सर्वात खाली म्हणजे १७.३५ टक्क्यांवर पोहचली आहे.

मुंबई आणि उपनगरात महिन्याभरानंतर हजेरी लावली असली तरी, तलावक्षेत्रात पुरेसा पाणीसाठा होईल का असा प्रश्न आहे. मात्र पुरेसा पाणी साठी न जमा झाल्यास मुंबईवरील पाणी संकट अटळ आहे.


NTA NEET 2021 : आता नीट परीक्षा तब्बल १३ भाषांमध्ये देता येणार; तर कुवेतमध्ये सुरु झालेयं नवे परीक्षा केंद्र


- Advertisement -

 

- Advertisement -