घरमुंबईमुंबईतील हवेच्या गुणवत्तेत मोठी घसरण; श्वसनासंबंधित आजार वाढले

मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत मोठी घसरण; श्वसनासंबंधित आजार वाढले

Subscribe

चिंताजनक बाब म्हणजे माझगाव येथील हवेची गुववत्ता (AQI) दिल्लीपेक्षा वाईट म्हणजे 426 वर होता. त्यामुळे मुंबईसाठी ही बाब गंभीर आहे.

देशाची राजधानी दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या हवेची गुणवत्ता देखील दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. यात 26 जानेवारीपासून धुक्यांचे वादळ कमी झाले. तर दीर्घकाळपर्यंत असलेले अल्हाददायक वातावरणही कमी होत आहे. त्यामुळे रविवारी मुंबईतील हवेची गुणवत्ता खूप खराब नोंदवली गेली. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 316 च्या आसपास होता. तर दिल्लीचा AQI (320) इतका होता. चिंताजनक बाब म्हणजे माझगाव येथील हवेची गुववत्ता (AQI) दिल्लीपेक्षा वाईट म्हणजे 426 वर होता. त्यामुळे मुंबईसाठी ही बाब गंभीर आहे.

मुंबईलगत मोठ्याप्रमाणात समुद्र किनारे असल्याने प्रदुषण जलद गतीने पसरण्यात मदत होते. मात्र हे समुद्री वारे नसले तर मुंबईचा AQI हा नियमितपणे दिल्लीपेक्षा अत्यंत वाईट स्थितीत असता असे तज्ञांचे मत आहे.

- Advertisement -

रविवारी कुलाबा, चेंबुर आणि अंधेरी येथील AQI देखील अत्यंत खराब श्रेणीत होता. त्यामुळे ही परिस्थिती कामगार वर्गासाठी खूप हानीकारक असल्याचे म्हटले जातेय. कारण यामुळे श्वसनासंबंधित आजार बळावत आहेत.

24 – 25 जानेवारी रोजी मुंबई शहरातील हवेचा AQI ने 500 चा आकडा ओलांडल्यानंतर अनेक मुंबईकरांना घसा, छाती आणि इतर श्वसनासंबंधित वाढू लागले आहे. ही गोष्ट मुंबईकरांसाठी कुठेतरी घातक आहे. यात 25 जानेवारीची प्रदुषणाची पातळी ही एक विक्रमी असल्याचे म्हटले आहे. कारण मुंबईत याआधी कधीही 500 च्या पुढे AQI नोंदवले गेले नव्हते.


JNU Vice Chancellor : पुणे विद्यापीठाच्या शांतीश्री पंडित बनल्या JNU च्या पहिल्या महिला कुलगुरू


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -