घरमुंबईआंदोनलाच्या तीव्रतेचे पडसाद अधिवेशनात उमटतील-- छगन भुजबळ यांचा इशारा

आंदोनलाच्या तीव्रतेचे पडसाद अधिवेशनात उमटतील– छगन भुजबळ यांचा इशारा

Subscribe

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी हे आंदोलन अधिक तीव्र होणार असून त्याचे पडसाद अधिवेशनात उमटतील असा भाजपला सूचक इशारा दिला.

छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर महापुरुषांवर भाजप नेत्यांकडून सातत्याने अपमानास्पद वक्तव्ये केली जात आहेत. याविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. याचपार्श्वभूमीवर आज मविआने महामोर्चाचे आयोजन केले असून यात सामान्य नागरिकांबरोबरच मविआतील अनेक ज्येष्ठ नेतेही सहभागी झाले आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी हे आंदोलन अधिक तीव्र होणार असून त्याचे पडसाद अधिवेशनात उमटतील असा भाजपला सूचक इशारा दिला.

भुजबळ यांनी मीडियाशी बोलताना भाजपला लक्ष्य केलं. महाविकास आघाडीच्या महामोर्चाला प्रसिद्धी मिळू नये यासाठी भाजपचा खटाटोप सुरू आहे. राज्यपालांपासून मंत्र्यापर्यंत चुका त्यांनी करायच्या आणि माफी मात्र आम्ही मागायची. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हा देखावा आहे असेही भुजबळ यांनी यावेळी म्हटले. महापुरुष, छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर ही आमची दैवतं आहेत. त्यांचा अपमान केला जातोय.हे महाराशट्र सहन करणार नाही असा इशाराही यावेळी भुजबळ यांनी भाजपला दिला. जशी गणपतीची मिरवणूक काढली जाते त्याचप्रमाणे या महापुरुषांना हृदयस्थानी ठेवून आम्ही चालत आहोत. भाजप माफीचे आंदोलन करून लोकांचे लक्ष विचलित करत आहे. पण जनतेला सगळे माहित आहे. महामोर्चा हे पहीलं आंदोलन आहे.ते आधिक तीव्र होत जाणार असून त्याचे पडसाद अधिवेशनात उमटणार असा इशाराही भुजबळ यांनी यावेळी दिला. तसेच महागाई, बेरोजगारी, राज्याबाहेर जाणारे उद्योग आणि महापुरुषांचा अपमान हे विषय अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -