घरताज्या घडामोडी'अशोक चव्हाणांचं चुकलं', नवाब मलिकांची नाराजी

‘अशोक चव्हाणांचं चुकलं’, नवाब मलिकांची नाराजी

Subscribe

अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये केलेल्या वक्तव्यानंतर आता शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाचे राज्यातले महत्त्वाचे नेते आणि विद्यमान महाविकासआघाडी सरकारमधले सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचं एक वक्तव्य गेल्या २४ तासांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात भलतंच गाजतंय. महाविकासआघाडी स्थापन करण्यापूर्वी ‘संविधानाप्रमाणेच कारभार चालवला जाईल, संविधानाच्या बाहर कामकाज होणार नाही, असं शिवसेनेकडून लिहून घेण्याच्या अटीवरच सोनिया गांधींनी सत्तेत सहभागी होण्यासाठी परवानगी दिली होती’, असं अशोक चव्हाण नांदेडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलले होते. मात्र, त्यांचं हे वक्तव्य चांगलंच बुमरँग झालं आहे. विरोधकांआधी सत्ताधारी पक्षातल्याच काँग्रेस आणि शिवसेनेने चव्हाणांचं हे विधान खोडून काढल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

घटकपक्षांचीही नाराजी

अशोक चव्हाणांचं हे वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्यानंतर आधी एकनाथ शिंदेंनी आपली नाराजी दर्शवली होती. ‘काँग्रेसला असं काहीही शिवसेनेने लिहून दिलेलं नाही. मात्र, राज्यातला कारभार हा संविधानानुसारच चालेल’, असं शिंदे म्हणाले होते. त्यांच्या पाठोपाठ महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही, ‘चव्हाण नेमकं काय म्हणाले ते माहीत नाही, पण सरकार संविधानाच्या चौकटीतच चालते’ असं म्हणत चव्हाणांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली. या पार्श्वभूमीवर आता नवाब मलिकांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले नवाब मलिक?

याविषयी विचारल्यानंतर नवाब मलिकांनी अशोक चव्हाणांवर टिप्पणी केली. ‘राज्यातलं महाविकासआघाडीचं सरकार हे किमान समान कार्यक्रमावरच स्थापन झालेलं आहे. कुणीही कुणाकडूनही काहीही लिहून घेतलेलं नाही. तिन्ही पक्षांनी किमान समान कार्यक्रमावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण यांची बोलण्याची पद्धत चुकीची होती’, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.


वाचा सविस्तर – …तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, तसे आदेश आहेत-अशोक चव्हाण
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -