घरताज्या घडामोडी'निर्भयाची पुनरावृत्ती'; गुप्तांगात रॉड घालून केला हत्येचा प्रयत्न

‘निर्भयाची पुनरावृत्ती’; गुप्तांगात रॉड घालून केला हत्येचा प्रयत्न

Subscribe

नागपूरमधील पारडी गावात एका १९ वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने पीडितेवर बालात्कार केल्यानंतर पीडीतेच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घालून मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २१ जानेवारीला घडली. २१ जानेवारीला ही पीडित तरूणी घरात एकटीच होती. यावेळी तीचा भाऊ आपल्या मित्रांबरोबर गावी गेला होता. यावेळी आरोपीने संधी साधून या पीडितेच्या घरात प्रवेश केला आणि तिच्यावर बलात्कार केला. आरोपी इथेलच थांबला नाही तर त्याने मुलीच्या गुप्तांगात रॉड घालून मारण्याचा प्रयत्न केला, आणि पसार झाला.

- Advertisement -

पीडितेने आपल्या गंभीर अवस्थेत घडलेला सगळा प्रकार आपल्या भावाला सांगितला. त्यानंतर २४ जानेवारीला पीडीतेचा भाऊ आणि पीडितेने पोलिस स्टेशनला येऊन आरोपी योगीलाल राहंगड विरोधात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गंभीर्य लक्षात घेऊ पोलिसांनी तक्रार दाखल केली आणि आरोपीला गोंदियामधून अटक केली. पोलिसांनी सांगितल्या प्रमाणे आरोपी आणि पोलिस एकाच ठिकाणी काम करतात. पोलिस पुढील तपास करत आहेत.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी सांगितले की, पीडित २४ जानेवारीला पोलिस स्टेशनला आली आणि घडलेल्या घटनेची माहिती दिली. सुरूवातीला आम्ही पीडितेवर उपचार केले आणि ताबडतोब आरोपीला पकडण्यासाठी एक टीम तयार केली. आरोपीला गोंदियातून अटक करण्यात आली आहे. पीडित ज्या कंपनीत हेल्पर म्हणून काम करत होती. त्याच कंपनीत आरोपी सुपरवाईजरच काम करत होता. पीडितेने आपल्या तक्रारमध्ये सांगितले की, आरोपीने रॉड घालण्याचा प्रयत्न केला. त्याची चौकशी सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -