घरमुंबईसंविधान टिकून राहणे हिच सर्वांसाठी हिताची गोष्ट - प्रेरणा बलकवडे

संविधान टिकून राहणे हिच सर्वांसाठी हिताची गोष्ट – प्रेरणा बलकवडे

Subscribe

शासनाच्या जनविरोधी कारभाराचा निषेध म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने संविधान दिनानिमित्त संविधान मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

सध्याचे केंद्र व राज्य सरकारने अनेक देशविरोधी निर्णय घेऊन भारतीय राज्यघटनेचा दुरुपयोग चालविला असल्यामुळे भारताची लोकशाही ही धोक्यात आलेली आहे. सदर शासनाच्या जनविरोधी कारभाराचा निषेध म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने संविधान दिनानिमित्त संविधान मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्ष अनिता भामरे, कार्याध्यक्ष सुषमा पगारे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शालीमार येथे निदर्शने करून जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन देण्यात आले.

भाजप आमदार राम कदमांवरही टीका

“स्वतःचा फायदा करून घेत असताना समाजातील इतर कुठल्याही घटकाला त्रास होता कामा नये” अशी आपल्याला संविधानाची शिकवण आहे.मात्र आज देशभरात ज्या प्रकारच्या घटना घडत आहेत,त्यात सत्ताधारी स्वताच्या फायद्याच्या गोष्टीवर लक्ष देत आहेत. त्यामध्ये संविधानांच्या अनेक मूल्यांना धक्का बसल्याचे आढळत आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी आपले रक्त सांडले म्हणून आपण सर्व या देशात शांतीने वावरत आहोत. त्याचमुळे आपल्याला संविधानाने मुलभूत अधिकार दिले. मात्र शासन त्या अधिकारावर गधा आणत असून संविधानातील नमूद केलेल्या समानता, एकता,बंधुभाव, स्वातंत्र्य या मुल्यांचे पालन होताना दिसून येत नाही. सध्याचे सरकार याबाबत निष्ठा नसून शब्दांचे खेळ करून दिशाभूल करण्यात तरबेज आहे. महिलांवर व बालकांवर होणारे अत्याचार, सामुहिक बलात्कार व हत्या प्रकरणे तसेच दलित व मागासवर्गीय समाजावर होणारे अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून समाजात अशांतता पसरली आहे. इतकेच नाही तर भाजप आमदार राम कदम सारखे लोकप्रतिनिधी मुलींना उचलून आनून मुलांसोबत लग्न लावून देण्याची भाषा भर कार्यक्रमात करतात. तरी त्यांच्यावर आजपर्यंत कुठलीही कार्यवाही होत नाही. ही शासनाची एकाधिकारशाहीच आहे.

- Advertisement -

शेतकऱ्यांसोबतही झाला अन्याय

प्रचंड दुष्काळाच्या दाहकतेत महाराष्ट्र होरपळत असताना हे राज्य ज्याच्या कष्टावर कृषिप्रधान म्हणून ओळखल जाते त्याच शेतकरी राजा सोबत सरकार गेल्या ४ वर्षापासून शब्दांचे खेळ खेळून फसवून करत आहे.
पूर्वनियोजित औरंगाबाद ची दंगल ज्यात पोलीस आणि लोकसभा प्रतिनिधी सामाजिक तेढ निर्माण करतात. समाजात अशांतता पसरवून जातीय जातीय व सामाजिक तेढ निर्मन केली जातेय. ती फक्त वोट बँक टिकविण्यासाठी, या सर्व गोष्टी सामान्य नागरिकांच्या लक्षात येत असून समाजात एक भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. आज लोकतंत्र आणि न्यायव्यवस्था धोक्यात आली आहे. देशभरात असलेली काही शक्तींची एकवटलेली ताकद व कायदा हातात घेऊन काम करण्याची पद्धत यामुळे सरकारचे यासंदर्भात छुपे धोरण सगळीकडे हुकुमशाही अराजकता व गोंधळाचे वातावरण झाले आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -