घरमुंबईशरद पवारांचा महात्मा फुले समता पुरस्कारनं होणार सन्मान

शरद पवारांचा महात्मा फुले समता पुरस्कारनं होणार सन्मान

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा  महात्मा फुले समता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा सन्मान केला जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा महात्मा फुले समता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा सन्मान केला जाणार आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. मानपत्र, एक लाख रुपये, मानचिन्ह आणि फुले पगडी असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

महात्मा फुले यांच्या १२८व्या स्मृतीदिनानिमित्त बुधवारी २८ नोव्हेंबर रोजी समता दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला आहे. पुण्यात बुधवारी सकाळी ९.३० वाजता कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यभरातू कार्यकर्ते येणार आहेत. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून केंद्रीय मानवसंसाधन राज्यमंत्री उपेंद्र कुशवाहा, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट शिवाय, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ देखील उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय, विजय शिवतारे, पुण्याचे महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी, कुमार केतकर,डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. अरुंधती रॉय, खासदार शरद यादव, प्रा. हरि नरके, उत्तम कांबळे, डॉ. बाबा आढाव, डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. रावसाहेब कसबे, बाळकृष्ण रेणके, वीरप्पा मोईली यांना देखील महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

वाचा – पडद्याआडचे पगडीआख्यान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -