चंद्रकांत पाटील व भाजपने शरद पवारांची जाहीर माफी मागावी, अन्यथा… – रविकांत वरपे

ncp warns to take action if bjp does not apologize to sharad pawar
ncp warns to take action if bjp does not apologize to sharad pawar

भाजपच्या ट्विटर अकाऊंडवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांविषयी एक आक्षेपार्ह ट्विट करण्यात आल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला कायदेशीर लढाईचा इशारा दिला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी एक पत्रक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपाने पवारांची माफी मागणी असे म्हटले आहे.

भाजपाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ट्विट करत शरद पवार हिंदू धर्माचा द्वेष, अपमान करतात अशी मुक्ताफळे उधळलेली आहेत. असे सांगत भाजपाच्या विपरीत बुद्धीची व जाती धर्मात तेढ निर्माण करण्याच्या वृत्तीची कीव येते असा टोला वरपे यांनी लगावला आहे.

शरद पवार यांनी कोणत्याही जाती धर्माचा अपमान होईल, अशी कृती केलेली नाही. हिंदू देव देवतांचा अपमान केलेला नाही. उलट हिंदू धर्मातील देवदेवतांचा आदर करत आल आहेत. हिंदू दवतांच्या मंदिरांचा पवार यांनी जीर्णोद्धार केलेला आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. मात्र, महाराष्ट्रात काहीही करुन तेढ निर्माण करुन सत्तेसाठी हपापलेले भाजपाचे नेते पवारांना हिंदू विरोधी ठरवून खालच्या पातळीवरचे राजकारण करत आहेत, अशी टीका वरपे यांनी केली आहे.