PM मोदींनी राजकारण दूर ठेवून काश्मिरी पंडितांचे प्रश्न सोडवावे, संजय राऊतांचे वक्तव्य

petrol diesel issue sanjay raut criticizes bjp union Government should first reimburse state's share of GST
केंद्रानं पहिले राज्याच्या वाट्याचा GST परतावा द्यावा, पेट्रोल-डिझेलच्या मुद्द्यावरुन राऊतांची टीका

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. काश्मिर खोऱ्यातील काश्मिरी पंडितांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारन लक्ष द्यावे, पंडितांच्या घरवापसीबाबत विचार करावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच राजकारणाचा विषय बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांभीर्याने दखल घ्यावी असे संजय राऊत म्हणाले आहेत. काल एका काश्मिरी पंडित आपल्या कार्यालयात बसलेला असताना त्याची हत्या करण्यात आली आहे. यावरुन देशात चर्चा सुरु झाली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काश्मिरमधील प्रश्नांवर भाष्य केलं आहे. राऊत म्हणाले की, सातत्याने काश्मिरी पंडितांच्या हत्या पुन्हा काश्मिर खोऱ्यात सुरु झाल्या आहेत. काल पुन्हा एकाची हत्या झाली आहे. काल एक तरुण सरकारी कर्मचारी आपल्या कार्यालयात काम करत असताना त्याची हत्या झाली आहे. हे वारंवार होऊ लागले आहे. काश्मीरचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. केंद्र सरकारने खासकरुन पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गांभीर्याने हा विषय घेतला पाहिजे. काही वेळ राजकारण दूर ठेवलं पाहिजे. भाजप आणि मोदी सरकारचा मुख्य अजेंडा होता की, काश्मिरी पंडितांची घरवापसी, त्यांची सुरक्षा, त्यासाठी ३७० कलम हटवलं आहे. काश्मिरचे विभाजन करण्यात आले आहे. आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. तरिही घरवापसी होऊ शकली नाही. काश्मिर आजही अशांत आहे. फक्त तिकडच्या घटना बाहेर येत नाहीत.

काल ज्या तरुणाची हत्या झाली तो काश्मिरी पंडित आहे. फक्त पंडित नसून तो तेथील सामान्य जनतेचं जीवन असुरक्षित आहे. असं वारंवार सांगण्यात येत आहे. पाकिस्तानकडे बोट दाखवून चालणार नाही तर तुम्ही काय करणार हे पाहावं लागेल. काश्मिरसारखे प्रश्न आहेत ते हनुमान चालीसा, लाऊड स्पीकर यावरुन लोकांचे मन विचलीत करता येणार नाही. सगळे त्या प्रश्नाकडे देशातील नेते संवेदनशीलपणे पाहत आहेत. शिवसेनासुध्दा संवेदनशीलतेने पाहत आहे. आम्हाला काय करता येईल ते आम्ही करु पण सरकार काय करतंय, सरकारने काही काळ राजकारण बाजूला ठेवून या प्रश्नाकडे लक्ष द्यावे. एका बाजूला चीन घुसलं आणि दुसऱ्या बाजूला काश्मिरचा प्रश्न निर्माण झाला आहे.


हेही वाचा : औरंगजेबच्या कबरीपुढे गुडघे टेकवणाऱ्या ओवैसींना त्याच मातीत गाडू, संजय राऊतांचा ओवैसी बंधूंना इशारा